Gold Price Today | विजयादशमीनिमित्त सोनं खरेदीसाठी ग्राहकांची झुबंड; 400 कोटींचा टप्पा पार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Gold Price Today | मागील महिन्यापासून आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमती (Gold Price Today) उतरताना दिसत होत्या. त्यामुळे ग्राहकांना सोनं खरेदी करण्यासाठी एक मोठी संधी निर्माण झाली होती. मात्र, यंदा विजयादशमीच्या मुहूर्तावरही सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुबंड उडाली आहे. विजयादशमी दस-याला मुंबईमध्ये (Mumbai) सोनं खरेदीकरण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. या सनाच्या मुहूर्तावर सराफा बाजारात सुमारे 400 कोटी रुपयांचा व्यवसाय झाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, सध्या सोन्याचा भाव 49,590 रुपये प्रति तोळा आहे. अशातही बाजारात खरेदीसाठी उत्साह पाहायला मिळाला.

सोनं खरेदी (Gold Price) करण्यासाठी सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी झाल्याने सोने व्यापारी खूश आहेत.
तर, व्यापाऱ्यांनी या वेळी महाराष्ट्रात 400 कोटींची सोने खरेदी व मुंबईत 200 कोटींची सोने खरेदी होईल, असा अंदाज बांधला होता.
पंरतु, या विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर केवळ मुंबईत 400 कोटींची सोने खरेदी झाली आहे.
गतवर्षी अनेक लोकांना सोनं खरेदी करता आले नाही. दरम्यान सोनं खरेदी करण्यासाठी बाजारात ग्राहकांचा मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला.
त्यामुळे यंदा मुंबईत रेकॉर्डब्रेक सोने खरेदी (Gold Price Today) झाली आहे.

दरम्यान, यंदाचा दसरा व्यापाऱ्यांसाठी आनंद द्विगुणित करणारा ठरला. मुंबईतील विविध परिसरांमधील बाजारपेठांमध्ये खरेदीला ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
त्यामुळे यंदाचा सन ग्राहकांनी आनंदीत घालवला आहे. दरम्यान मोठ्या प्रमाणात खरेदीला उत्तेजन मिळाल्याने व्यापा-यांच्यात आनंद दिसून आला.

 

Web Title : Gold Price Today | dussehra buys record breaking gold mumbai four hundred crore crossing stage know in details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Modi Government | नोकरीसोबत सुरू करा ‘हा’ व्यवसाय, 1 लाख रुपयांपर्यंत होईल नफा; मोदी सरकारकडून मिळेल 80% कर्ज

Aurangabad Accident | औरंगाबाद जिल्ह्यात ट्रॅक्टर-दुचाकीच्या भीषण अपघातात बहीण भावासह भाचीचा मृत्यू

Maharashtra Rains | महाराष्ट्रात आगामी 2 दिवसांत मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार, IMD चा इशारा