Gold Price Today | सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या चांदीचा दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Price Today | दिवसेंदिवस सोने आणि चांदीच्या किंमतीत चढ उतार दिसून येत आहे. मागच्या आकडेवारीनुसार सोन्याच्या दरात (Gold Price Today) वाढ तर चांदीच्या दरात घसरण झाल्याचे दिसले. दरम्यान आता सोन्या चांदीच्या किंमतीत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज (शुक्रवार) 10 जून रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 50, 815 रुपये आहे. तसेच, चांदीची किंमत (Silver Price) 60,820 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.

 

कमॉडिटी बाजारात (Commodity Market) नफा वसुली केली आहे. यामुळे आज सोनं (Gold Price Today) जवळपास 200 रुपयांनी तर चांदीत 550 रुपयांची घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर (Multi Commodity Exchange) सध्या सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचं दिसत आहे. या दरम्यान, जागतिक कमॉडिटी बाजारात स्पॉट गोल्डचा दर 1,844,78, डॉलर प्रती औंस इतका खाली आला आहे. त्यामध्ये 0.2 टक्के घसरण झाली आहे. चांदीचा दर 21.63 डॉलर आहे. त्यामध्ये 0.1 टक्के घसरण झाली. नजीकच्या काळात सोनं 1830 डॉलरपर्यंत खाली येईल, असे मत कमॉडिटी विश्लेषकांकडून सांगण्यात आलं आहे.

 

आजचा सोन्याचा भाव –

दिल्ली –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,750 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,100 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,750 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,100 रुपये

 

चेन्नई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,200 रुपये

 

कोलकाता –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,750 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,100 रुपये

 

Web Title :- Gold Price Today | gold and silver price fall today 10th june 2022 marathi news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा