Gold Price Today | सोन्याची घसरण सुरूच, चांदीची चमक सुद्धा उतरली, जाणून घ्या आजचा नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या दर मंगळवारी 597 रुपयांच्या घसरणीसह 46,814 रुपये प्रति 10 ग्रॅमवर राहिला. मागील व्यवहाराच्या सत्रात सोने 47,116 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. चांदीसुद्धा 369 रुपयांच्या घसरणीसह 60,625 रुपये प्रति किलोग्रॅम राहिली. जी मागील सत्रात 61,222 रुपये प्रति किलोग्रॅम होती. (Gold Price Today)

 

एचडीएफसी सिक्युरिटीजचे सिनियर अ‍ॅनालिस्ट (कमोडिटीज), तपन पटेल यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1,804 डॉलर प्रति औंसवर आणि चांदी 22.83 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत होते. दिल्लीत 24 कॅरेट सोन्याची स्पॉट प्राईस 302 रुपयांनी कमी झाली. COMEX वर झालेल्या सोन्याच्या किमतीमधील घसरणीनंतर ओव्हरनाईट हा प्रभाव दिसून आला.

 

2015 च्यानंतर दिसून आली इतकी मोठी घसरण
2021 मध्ये सोन्यात ग्लोबल मार्केटमध्ये 3.6 टक्के घसरण दिसून आली. जी 2015 च्या नंतर ही सर्वात मोठी वार्षिक घसरण आहे. आरबीआयने कोरोना महामारी दरम्यान हळुहळु उचललेल्या मदतीच्या पावलांना आता महागाईचा सामना करण्यासाठी मागे खेचताना दिसत आहे, ज्याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर दिसून येत आहे. (Gold Price Today)

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या रेट
सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस्ड कॉल द्या यानंतर तुमच्या फोनवर मेसेज येईल. ज्यामध्ये ताजे भाव पाहू शकता.

 

हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या
ज्वेलरी खरेदी करण्यासाठी जात असाल तर हे लक्षात ठेवा की, हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या.
पुन्हा विकताना विना हॉलमार्कवाल्या ज्वेलरीची योग्य किंमत मिळवणे अवघड होऊन बसते.
विक्रीच्या वेळी हॉलमार्कवाल्या ज्वेलरीचे मूल्य तेव्हाच्या बाजार भावावर ठरते. यासाठी हॉलमार्क सर्टिफिकेट असणारी ज्वेलरी खरेदी करा.

 

Web Title :- Gold Price Today | gold price today 4 january 2022 gold rate dipped and silver also check latest sonyacha dar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ ! गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 350 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

DA DR Hike | सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यावर प्रतिबंध लावल्याचे वृत्त? जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण

 

Pune Corona Updates | पुणे जिल्हा, पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या शाळा बंद – अजित पवार

 

Pune Corona | अत्यंत चिंताजनक ! पुण्यात गेल्या 24 तासात 1100 पेक्षा जास्त कोरोनाचे नवे रूग्ण आढळले, जाणून घ्या इतर आकडेवारी