Pune Corona | अत्यंत चिंताजनक ! पुण्यात गेल्या 24 तासात 1100 पेक्षा जास्त कोरोनाचे नवे रूग्ण आढळले, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आज (मंगळवार) पुणे शहरातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आज शहरामध्ये हजाराच्या वर रुग्ण आढळून आले आहेत. त्यातच ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून येत असल्याने चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona) 1104 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 151 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 12 हजार 689 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona) आढळून आले आहे. त्यापैकी 5 लाख 144 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24
तासात शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 119 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटल्याने अॅक्टिव्ह रुग्णांची
(Active Patient) संख्या वाढली आहे. पुणे शहरामध्ये सध्या 3790
अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 89 रुग्ण गंभीर आहेत. तर 76 रुग्ण
ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध
केंद्रावर 6819 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत 38 लाख
92 हजार 879 तपासणी करण्यात आल्या आहेत.

 

 

 

Web Title :-  Pune Corona | Extremely worrying! More than 1100 new corona patients were found in Pune in the last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

ONGC CMD Alka Mittal | अलका मित्तल यांच्या हाती ONGC ची कमान ! एकेकाळी ‘ट्रेनी’ म्हणून ज्वाईन केली होती सर्वात मोठी ऊर्जा कंपनी, आता बनल्या CMD

Mera Ration App | रेशन दुकान बदलायचं आहे? मग, ‘मेरा रेशन’ ॲप करा डाऊनलोड; जाणून घ्या

Food-Medication Combination to Avoid | सावधान ! जर औषधासोबत करत असाल ‘या’ 6 गोष्टींचे सेवन तर आजच थांबवा, जाणून घ्या

Pune Crime | पोलीस स्टेशनमध्येच महिला पोलिसाच्या दुचाकीसह पेटवली 4 वाहने; प्रचंड खळबळ

Fish For Asthama Patient | माशांमुळे दम्याचा धोका होतो कमी, जाणून घ्या फायदे

PM JanDhan Yojana | प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत मिळताहेत 1.30 लाख रुपये; तुम्हाला फक्त करावं लागेल ‘हे’ काम