Gold Price Today | आज स्वस्त झाले सोने, जाणून घ्या काय आहे 1 तोळ्याचा दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | ग्लोबल मार्केटमध्ये सोन्याच्या कमजोरी सोबतच देशात सुद्धा सोने स्वस्त  (Gold Price Today) झाले आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात मंगळवारी सोने 23 रुपयांनी घसरून 47,814 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले.

 

मागील व्यवहाराच्या सत्रात सोने 47,837 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. एचडीएफसी सिक्युरिटीजने दिल्लीच्या सराफा बाजार दराबाबत माहिती दिली.

 

चांदी मंगळवारी स्थिर राहिली  (Silver Price Today 18 January 2022). मंगळवारी ती 61,835 रुपये प्रति किलोग्रॅमवर होती, तर मागील व्यवहाराच्या सत्रात 61,836 रुपये प्रति किलोग्रॅम होती.

 

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी म्हटले की, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर थोडे घसरून 1,817 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत होते. तर चांदी 22.94 डॉलर प्रति औंसवर स्थिर होती. (Gold Price Today)

 

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या रेट
सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस्ड कॉल द्या यानंतर तुमच्या फोनवर मेसेज येईल. ज्यामध्ये ताजे भाव पाहू शकता.

 

हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या
ज्वेलरी खरेदी करण्यासाठी जात असाल तर हे लक्षात ठेवा की, हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या. पुन्हा विकताना विना हॉलमार्कवाल्या ज्वेलरीची योग्य किंमत मिळवणे अवघड होऊन बसते. विक्रीच्या वेळी हॉलमार्कवाल्या ज्वेलरीचे मूल्य तेव्हाच्या बाजार भावावर ठरते. यासाठी हॉलमार्क सर्टिफिकेट असणारी ज्वेलरी खरेदी करा.

 

 

Web Title :- Gold Price Today | gold price today in delhi 18 january 2022 latest gold news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in Maharashtra | चिंताजनक! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 39,207 नवीन रुग्ण, 53 जणांचा मृत्यू; जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune Corona Updates | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 4866 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Akshay Kumar Wedding Anniversary | लग्नाच्या 21 व्या वाढदिवसानिमित्त अक्षय कुमारने पत्नी ट्विंकल खन्नासाठी लिहिली पोस्ट, म्हणाला…