Gold Price Today । सोन्याच्या दरात किंचित वाढ तर चांदीच्या किंमतीत घसरण, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today । मागील काही दिवसापासून भारतात सोने आणि चांदीच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. तर सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसापासून घट होत आहे. मात्र, आज शुक्रवारी सोन्याच्या किंमतीत (Gold Rates) साधारण वाढ झाली आहे. एमसीएक्स (Multi Commodity Exchange) नुसार 9 जुलै रोजी सोन्याच्या भावात 0.31 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यांनतर आता सोन्याचा दर (Silver Price Today) 47,868 रुपये प्रति तोळावर पोहोचला आहे. तसेच, आज शुक्रवारी चांदीची किंमत (Silver Price Today) कमी झाली आहे. सप्टेंबरच्या चांदीचे वायदे किंमत 0.27 टक्क्यांनी घसरली. यावरून आता चांदीचा भाव 68,778 रुपये प्रति किलो आहे.

रेकॉर्ड स्तरापेक्षा 8 हजार रुपयांनी सोनं स्वस्त –
मागील वर्षी ऑगस्टमध्ये एमसीएक्सवर सोन्याचा भाव 56,191 रुपये प्रति तोळाच्या सर्वोच्च पातळीवर होता. तर आज सोन्याची ऑगस्टची वायदे किंमत(Gold Rates) 47,868 रुपये प्रति तोळा आहे. म्हणजे अजून सोन्याचा भाव सर्वोच्च स्तरापेरेक्षा 8 हजार रुपयांनी कमी आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत –
दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर (शुक्रवारी) 9 जुलै रोजी अमेरिकन ट्रेजरी यील्डमध्ये घसरण बघायला मिळाली,
म्हणून सोन्याची किंमत उसळली आहे.
ज्यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे.
स्पॉट सोन्याची किंमत (Gold Rates) 0.2 टक्क्यांनी वाढून 1,805.39 डॉलर प्रति औंस झालीय.
रॉयटर्सच्या मते अमेरिकन सोन्याची किंमत दर 0.4 टक्क्यांनी वाढून 1,806.50 डॉलर इतके झाले आहेत.

कसे तपासाल सोन्याचे दर ?
तुम्ही घरबसल्या सोन्याचे दर (Gold Rates) मिळवू शकता.
त्यासाठी 22 आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Rates) जाणून घेण्यासाठी ग्राहकाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा द्यावे लागणार आहे.
काही वेळामध्येच तुमच्या मोबाइल क्रमांकावर दराबाबत एक मेसेज येईल.
याव्यतिरिक्त सोन्याच्या दराबाबत नवीन अपडेट्ससाठी तुम्ही www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देणे महत्वाचे आहे.

Web Titel :- gold price today gold rats fall by 8000 rs from record high silver price drop

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune News | ‘आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं, आम्हला काही नको’, तुम्ही एकत्र येऊन मार्ग काढा, संजय राऊतांचा पुण्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना सल्ला

Pune News | पोलीसनामाच्या बातमीचा दणका ! अखेर शिरुरचे नायब तहसीलदार ज्ञानदेव यादव यांच्यावर निलंबनाची कारवाई

EPFO | बदलणार PF खात्याशी संबंधीत नियम, EPF चे पैसे पाहिजेत तर आजच पूर्ण करा ‘हे’ काम