Gold Price Today | सोन्याच्या किमतीत पुन्हा घसरण, आता 8994 रुपये झाले ‘स्वस्त’; जाणून घ्या आजचे नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Gold Price Today | आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, आज सोन्याच्या किमतीत 23 रुपये प्रति 10 ग्रॅमची किरकोळ घसरण दिसून येत आहे. सध्या सोने 47306 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर आहे. शुक्रवारी सोने 47329 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर (Gold Price Today) बंद झाले होते.

 

चांदीत 31 रुपयांची किरकोळ वाढ

सोन्याच्या उलट आज चांदीच्या किमतीत थोडी वाढ दिसून येत आहे. चांदी 31 रुपयांच्या किरकोळ वाढीसह 62233 रुपये प्रति किलोग्रॅमच्या स्तरावर व्यवहार करत आहे. शुक्रवारी चांदी 62202 रुपये प्रति किलोग्रॅमच्या स्तरावर बंद झाली होती.

 

देशातील प्रमुख शहरात सोन्याचे नवीन दर

– दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर 48180 रुपये आहे, तर 22 कॅरेटचा भाव 44165 आहे.

– मुंबईत 24 कॅरेट 48,260 रुपये आहे, तर 22 कॅरेटची किंमत 44238 आहे.

– कोलकातामध्ये 24 कॅरेट 48200 तर 22 कॅरेट सोने 44183 रुपयांनी विकले जात आहे.

– चेन्नईत 24 कॅरेट 10 ग्रॅम गोल्डचा रेट 48,400 आणि 22 कॅरेटचा भाव 44367 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

 

अंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीचा भाव

जागतिक बाजारात सोन्यात किरकोळ घसरण झाली आहे. आज सोन्याचा दर 0.1 टक्के घसरून 1,779.12 डॉलर प्रति औंसवर राहिला. तर चांदी 0.2 टक्के वाढून 23.05 डॉलर प्रति औंस झाली आहे. प्लॅटिनम 998.85 डॉलरवर आहे.

 

सोने ऑलटाइम हायपासून 8994 आणि चांदी 17747 रुपयांनी स्वस्त

सोने आपल्या ऑलटाइम हायपासून 8994 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपये स्वस्त विकले जात आहे.
ऑगस्ट 2020 मध्ये सोने 56,200 रुपये प्रति 10ग्रॅम उच्च स्तरावर होते.

तर चांदीचा आतापर्यंतचा उच्च स्तर 79980 रुपये प्रति किलो आहे.
या हिशोबाने चांदी सुद्धा आपल्या उच्च स्तरापासून सुमारे 17747 रुपये स्वस्त विकली जात आहे.

 

Web Title : Gold Price Today | gold silver jewelry price rate latest update 23rd august know latest rate indian sarafa market today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Coronavirus | काय सांगता ! होय, कोरोनाच्या नियंत्रणासाठी महाराष्ट्रातील ‘या’ महापालिकेने केले तब्बल 2 हजार कोटी रूपये खर्च

Pune Metro Traffic | मेट्रोच्या कामासाठी संभाजी पुल (लकडी पुल) 20 दिवस दररोज रात्री 7 तास राहणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Anti Corruption Pune | पिंपरीनंतर आता पुणे मनपातील बडा अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, प्रचंड खळबळ