Gold Rate Today : लग्नसराईच्या काळात पुन्हा सोन्याचे दर वधारले, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात काही दिवसापासून वारंवार सोन्याच्या दरात घसरण होत असतानाच, पुन्हा एकदा सोन्याचांदीच्या किंमती वाढण्याला गती येत आहे असे दिसते. तर १८ मार्च पासून एक तोळा सोन्याचे दर १२० रुपयांनी वाढले आहेत. याबाबत गुरुवारी सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम १२ रुपयांची वाढ झाली आहे. तसेच आज देशात २२ कॅरेट सोन्याची किंमत ४३,९६० रुपये प्रति तोळा आहे. तर सोन्याच्या दराबाबत याबाबत जाणून घ्या..

तसेच, तज्ज्ञांच्या मते पुन्हा एकदा सोन्याच्या दरात तेजी येऊ शकते. भारतात लग्नसराईच्या काळात आता सोन्याचांदीच्या दराला पाठींबा मिळताना दिसतो. यामुळे आताच्या सोन्याच्या किंमती असताना तुम्ही गुंतवणूक केली तर फायद्याचं ठरू शकतं. त्यांच्या मते २०२१ मध्ये सोन्याच्या दरात आणखी वाढ होऊ शकते. तर साधारण सोन्याच्या दरात ६३,००० रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याच्या दरात वेग आलाआहे. अमेरिकेत सोन्याचे दर ०.१४ डॉलरने वाढून १,७२७,२२ डॉलर प्रति औंस झाले आहेत. तर चांदीचे दर ०.०९ डॉलरच्या तेजीमुळे २६.०२ डॉलर झाले आहेत. तर आजच्या सोन्याच्या दराबाबत जाणून घ्या.

सोन्याचा शहरामधील दर (२२ कॅरेट नुसार)

चेन्नई : ४२,३७० रुपये

मुंबई : ४३,९६० रुपये

पुणे : ४३,९६० रुपये

नागपूर : ४३,९६० रुपये

दिल्ली : ४४,१५० रुपये

कोलकाता : ४४,२७० रुपये

बेंगलुरू : ४२,०१० रुपये

हैदराबाद : ४२,०१० रुपये

केरळ : ४२,०१० रुपये

२४- कॅरेट सोन्याचा दर –

चेन्नई : ४६,२२० रुपये

मुंबई : ४४,९६० रुपये

दिल्ली : ४८,१६० रुपये

कोलकाता : ४६,९१० रुपये

बेंगलोर : ४५,८३० रुपये

हैदराबाद : ४५,८३० रुपये

केरळ : ४५,८३० रुपये

पुणे : ४४,९६० रुपये

नागपूर : ४४,९६० रुपये.