Gold Futures Price : सोन्याच्या किंमतीत ‘कमाली’ची घरसण, चांदीची ‘चमक’ देखील पडली ‘फिक्की’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : वायदा बाजारात मंगळवारी सोन्या-चांदीच्या किंमतीत लक्षणीय घसरण दिसून आली आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजता ५ जून २०२० च्या सोन्याचा वायदा भाव एमसीएक्स एक्सचेंजवर ४०१ रुपयांच्या घसरणीसह ४५,७९० रुपये प्रति १० ग्रॅम वर ट्रेंड करत होते. त्याचबरोबर मंगळवारी सकाळी ९:४१ वाजता ५ ऑगस्ट २०२० ची सोन्याची वायदा किंमत ४१४ रुपयांनी घसरून ४५,९३९ रुपये प्रति १० ग्रॅमवर ट्रेंड करत होती. ३ मे पर्यंत देशव्यापी लॉकडाऊनमुळे मंगळवारी देशातील सोन्या-चांदीच्या स्पॉट मार्केट बंद राहतील.

सोन्यासह चांदीच्या वायदा भावात मंगळवारी सकाळी घसरण दिसून आली. मंगळवारी सकाळी, एमसीएक्सवरील ५ मे २०२० च्या चांदीचा वायदा भाव १.०२ टक्क्यांनी म्हणजेच ४३० रुपयांनी कमी होऊन ४१,५२७ रुपये प्रतिकिलो होता. त्याशिवाय एमसीएक्सवर मंगळवारी सकाळी ३ जुलै २०२० चा चांदीचे वायदा भाव ०.९० टक्क्यांनी घसरून म्हणजेच ३८४ रुपयांच्या घसरणीसह ४२,१३६ रुपये प्रतिकिलोवर बंद झाला.

आंतरराष्ट्रीय बाजाराबद्दल बोलायचे झाल्यास मंगळवारी सकाळी सोन्याच्या स्पॉट आणि वायदा किमतीत घसरण दिसून आली. ब्लूमबर्गच्या मते मंगळवारी सकाळी सोन्याचा जागतिक भाव १ टक्क्याने म्हणजेच १७.११ डॉलरच्या घसरणीसह १,६९६.८८ डॉलर प्रति औंस वर ट्रेंड करत होता. त्याचबरोबर मंगळवारी सकाळी कॉमॅक्सवर सोन्याचा जागतिक वायदा भाव ०.७६ टक्के म्हणजेच १३.१० डॉलरच्या घरसणीसह १७१०.७० डॉलर प्रति औंस वर ट्रेंड करत होता. याशिवाय चांदीचा जागतिक वायदा भाव मंगळवारी सकाळी १.०१ टक्के म्हणेजच ०.१५ डॉलरच्या घसरणीसह १५.०५ डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता.

वायदा भाव म्हणेज काय ?
सोन्याचा व्यापार दोन प्रकारे होतो. एक स्पॉट मार्केटमध्ये आणि दुसरा वायदा बाजारात. वायदा बाजाराला कमोडिटी एक्सचेंज असेही म्हणतात. वायदा बाजारात कमोडिटी डिजिटल विकल्या आणि खरेदी केल्या जाऊ शकतात. वायदा बाजारात वस्तूच्या जुन्या व नव्या किंमतींच्या आधारे भविष्यातील किंमतींवर डील केले जातात. या बाजारात निश्चित तारखेपर्यंत सौदे होतात. वायदा बाजाराचा थेट परिणाम स्पॉट मार्केटवर होतो. स्पॉट मार्केट आणि फ्युचर्स मार्केटमधील वस्तूंच्या किंमतींमध्ये कोणताही मोठा फरक नाही.