Gold-Silver Rate Today : 2 दिवसांच्या घसरणीनंतर सोन्या-चांदीच्या दरात वाढ ! जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – 2 दिवसांच्या घसरणीनंतर सोन्या – चांदीच्या ((Gold-Silver Rate) दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याचं दिसत आहे. MCX वर शुक्रवारी सोन्याचा व्यवहार 418 रुपयांनी वाढून 50,700 रुपये प्रति 10 ग्रॅमवर झाला. दिवसाच्या अखेरीस 170 रुपयांखाली बंद झाला. गुरुवारी सोनं 50,282 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झालं. असं असलं तरीही सोनं त्याच्या सर्वाधिक स्तरावरून 6000 रुपयांनी स्वस्त झालं आहे.

शुक्रवारी चांदीच्या किंमतीतही (Silver Rate) जोरदार तेजी पहायला मिळाली. चांदीचा व्यवहार 748 रुपयांनी वाढून 60 हजार 920 रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. इंट्रा डे मध्ये चांदीचे दर हे 61,326 रुपयांपर्यंत पोहोचले.

दिवाळीपर्यंत चढ – ऊतार
मोतीलाल ओस्वाल फायनान्स सर्व्हीसेसचे कमोडिटी वॉईस प्रसिडेंट नवनीत दमानी यांनी सांगितलं की, जर तुम्हाला वाटत असेल की दिवाळीपर्यंत सोनं स्वस्त होईल तर हे चूक ठरू शकतं. सोन्याचा दर उंचावरून खाली येत 50 हजारांपर्यंत आलाय तर चांदी 60 हजारांच्या घरात आहे. येणाऱ्या काळातही चढऊतार सुरू असेल. दिवाळी पर्यंत सोनं 50 ते 52 हजार प्रति 10 ग्रॅमच्या रेंजमध्ये असेल असंही त्यांनी सांगितलं.

प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर पुढीलप्रमाणे (Gold Rate on 31st October 2020)

1) मुंबई – 50,890
2) बंगळुरू – 41,640
3) हैदराबाद – 51,650
4) चैन्नई – 51,640
5) कोलकाता – 52,450