Gold Prices Today : सोन्याची किमतीत घसरण सुरूच, जाणून घ्या आजचे दर

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  सोन्याच्या किंमतींमध्ये आज सलग चौथ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली, तर चांदीही आज स्वस्त झाली. एमसीएक्सवर आज जूनचा सोन्याचा वायदा 0.4% ने कमी होऊन 44,538 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. याखेरीज चांदी 0.3 टक्क्यांनी घसरून 63,985 प्रती किलो झाली आहे. या वर्षाच्या सुरूवातीपासूनच भारतातील सोन्याच्या किंमती सुमारे पाच हजार रुपयांनी खाली आल्या आहेत. यामुळेच जर आपल्याला सोने खरेदी करायचे असल्यास, ही चांगली संधी आहे, कारण यावेळी सोने 11 महिन्यांच्या सर्वात खालच्या पातळीवर आले आहे.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याने 57,000 च्या उच्चांकाची पातळी गाठली होती, परंतु त्यानंतर सोन्याचे दर 10 ग्रॅम 12,000 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. अशा वेळी सोन्यात गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे.

सोन्याचे नवीन दर :

दिल्ली बुलियन मार्केटमध्ये शुक्रवारी सोन्याच्या किंमती 0.4 टक्क्यांनी घसरल्या आणि राजधानी दिल्लीत सोन्याचे नवीन दर आता प्रति 10 ग्रॅम 44,538 रुपयांवर गेले आहेत. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 0.4% घसरून 1,704.90 डॉलर प्रति औंस झाले .

चांदीची नवीन किंमत :

चांदीच्या किंमतींमध्येही आज घट नोंदवली गेली. दिल्ली बुलियन मार्केटमध्ये या मौल्यवान धातूची किंमत 0.3 टक्क्यांनी घसरून 63,985 रुपये प्रति किलो झाली आहे.

पुढील दोन महिन्यांत होऊ शकते महाग

दरम्यान, तज्ञांच्या मते सोन्याचे दर कमकुवत होणे जास्त काळ टिकू शकत नाही. डॉलरचा कमकुवतपणा, वाढत्या महागाईचा दबाव आणि चलनवाढीचा थेट परिणाम सोन्याच्या भावावर झाला आहे. मात्र, येत्या दोन महिन्यांत सोन्याची किंमत 48,000 रुपयांपर्यंत जाईल. त्याचबरोबर दोन महिन्यांत चांदी 70,000 ते 72,000 रुपयांदरम्यान असेल. त्याचवेळी, आणखी एक तज्ञ म्हणतात की सोन्याची वाढ खूप वेगवान होईल आणि ती 45,500 रुपयांची पातळी ओलांडेल आणि 48,000 रुपयांपर्यंत पोहोचेल.