Gold Rate | वन नेशन, वन गोल्ड रेट ! देशभरात एकाच दरात होणार सोने विक्री

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. वन नेशन, वन गोल्ड रेट योजनेमुळे (One Nation, One Gold Rate scheme) देशभरात एकाच दरात सोने (Gold Rate) मिळणार आहे. सध्या तामिळनाडू (Tamil Nadu) ते जम्मू – काश्मीरपर्यंत (Jammu and Kashmir) सोन्याचे दर वेगवेगळे आहेत. परंतु हे सोने ज्या बंदरावर आयात होऊन उतरवले जाते तेथून ते देशभरात पाठवलं जातं. यामुळे होणाऱ्या वाहतुकीच्या खर्चामुळे प्रत्येक राज्यातील सोन्याचे दर (Gold Rate) वेगवेगळा होतो. मात्र आता ही परिस्थिती बुलियन एक्सचेंजमुळे (Bullion Exchange) बदलणार आहे. बुलियन एक्सचेंजच्या श्रेणीतील ज्वेलर्स आंतरराष्ट्रीय दराने सोने खरेदी करु शकतात. यामध्ये वाहतुकीचा खर्च वाचणार असून सोन्याचा दर कमी ठेवण्यात मदत होईल.

 

बुलियन एक्सचेंज म्हणजे काय ?

भारतीय बुलियन एक्सचेंज शेअर बाजाराप्रमाणे बाजार असेल. याठिकाणी सोने खरेदी-विक्री होईल. बुलियन एक्सचेंज मधील बुलियनचा अर्थ बिस्किट किंवा नाण्यांच्या स्वरूपात असलेलं उच्च गुणवत्तेचे सोने किंवा चांदी (Silver) आणि एक्सचेंज म्हणजे देवाणघेवाण. त्यामुळे बुलियन एक्चचेंजचा अर्थ सोने-चांदीची देवाणघेवाण असा आहे.

 

यापूर्वी केवळ काही बँका आणि केंद्रीय बँकांकडून मंजुरी मिळालेल्या संस्थांना देशात सोने किंवा चांदीची आयात करण्याची परवानगी होती.
मात्र आता बुलियन एक्सचेंजवर ग्राहक सोने खरेदी करु शकणार आहेत.
यामुळे सोन्याची आयात पारदर्शी होईल. बुलियन एक्सचेंजमुळे सोन्याचे दर कमी ठेवण्यास मदत होईल.
याशिवाय देशभरात सोने आणि चांदीसाठी एकच दर (Gold Rate) लागू होतील.

 

Web Title : –  gold and sliver rate today good news for gold buyers one country one rate across the country india international bullion exchange

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा