Pune Pimpri Crime | चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या डोक्यात कडप्पा घालून खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | पत्नीच्या चारित्र्यावर संशय (Suspicion of Character) घेऊन पत्नीच्या डोक्यात कडप्पा फरशी मारुन तिचा खून (Wife Murder) केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी (Wakad Police ) पतीला अटक (Husband Arrest) केली आहे. ही घटना काळाखडक येथे सोमवारी (दि.1) पहाटे तीनच्या सुमारास (Pune Pimpri Crime) उघडकीस आली.

 

ललिता रमेश पुजारी Lalita Ramesh Pujari (वय – 30) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर रमेश हनुमंत पुजारी Ramesh Hanumant Pujari (वय – 35 रा. काळाखडक, वाकड) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस नाईक श्रीकांत चंद्रकांत गायकवाड Shrikant Chandrakant Gaikwad (वय – 32) यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी पतीवर आयपीसी 302 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश पुजारी हा त्याची पत्नी ललिता हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळे दोघांमध्ये सतत भांडण होत होते. तसेच आरोपी पती ललिता यांना मारहाण करत होता. सोमवारी पुन्हा याच कारणावरुन दोघांमध्ये भांडण झाले. त्यावेळी आरोपीने तिच्या डोक्यात कडप्पा फरशी मारली. यात गंभीर जखमी होऊन ललिताचा मृत्यू झाला. ललिताचा खून करुन फरार झालेल्या आरोपी पतीचा पोलिसांनी शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ठाकूर (API Thakur) करीत आहेत.

 

 

Web Title : –  Pune Pimpri Crime | Murdered by putting Kadapa on wifes head due to suspicion of character

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा