सोनं-चांदी महागलं, सोन्याच्या भावानं गाठला ५ वर्षातील उच्चांक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव वधारले असून त्याचा थेट परिणाम भारतावर झाला आहे. सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७९७ रुपयांनी वधारून ३३,८७६ रुपये झाला. तर चांदीचा भाव प्रति किलो ८४३ रुपयांनी वधारून ३८,१४७ रुपये झाला. गेल्या पाच वर्षांत सोन्याच्या भावात झालेली ही उच्चांकी वाढ आहे. सोन्याचा भाव ३४,०००रुपये प्रति १० ग्रॅमच्या आसपास राहण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

‘या’ कारणामुळे भाववाढ –

येत्या काळामध्ये अमेरिकेत व्याजदरांमध्ये कपात होण्याचे संकेत मिळाले असून त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यातील गुंतवणुकीला पसंती दिली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचे पडसाद भारतातही उमटले असून सोने व चांदी दोन्हींचेही भाव वाढले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

नैसर्गिक पद्धतीने करा हार्मोन्स बॅलन्स

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो

कोणत्याही गोष्टीच टेंन्शन घेण्याअगोदर स्वतःचा विचार करा

योग्य पद्धतीने बटाटा खा आणि वजन नियंत्रणात ठेवा