वायदा बाजारात उच्चांक ! सोन्याच्या किंमतीनं बनवलं नवं ‘रेकॉर्ड’

ADV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या कोरोनाचे संकट जगभरात पसरले असले तरी सोन्याच्या किंमतीत सतत वाढ होताना दिसत असून बुधवारी सोन्याच्या किंमतीने नवीन रेकॉर्ड नोंदवले आहेत. बुधवारी एमसीएक्स एक्सचेंजवर ५ जून २०२० चा सोन्याचा वायदा भाव ४६,६७० रुपये प्रति ग्राम ट्रेंड करत नवीन रेकॉर्ड केले असून हा आतापर्यंतचा सर्वात उच्च स्तर आहे.

५ ऑगस्ट २०२० चा वायदा भाव बुधवारी ०.८५ टक्क्याने ३९६ रुपयांनी वाढत ४६,८५० रुपये प्रति १० ग्रामवर ट्रेंड करत होता. तर वायदा बाजारात चांदीच्या किंमतीत देखील वाढ झाली असून एमसीएक्सवर मे २०२० चा चांदीचा वायदा भाव १.५२ टक्क्यांनी वाढून ४४,४२० रुपये प्रति किलो झाला होता.

ADV

दरम्यान जागतिक स्तरावर बुधवारी सोन्याचा भाव खाली आला असून ब्लूमबर्गनुसार सोन्याची किंमत आज ३.७६ डॉलरले घटला आहे. तसेच जागतिक वायदा बाजारात ०.०६ डॉलरने किंमत खाली आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्यामुळे देशातील बाजारपेठा बंदच राहणार आहेत.