सोन्याचे दर पुन्हा घसरले, चांदी देखील 300 रूपयांची ‘स्वस्त’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या दरात घसरण सुरु झाली आहे. आज पुन्हा एकदा सोन्याच्या भावात पुन्हा घसरण झालीय . तर चांदीचे भावही ३०० रुपयांनी घसरले आहेत. त्यातच आज आज मकरसंक्रांतीचा सण आहे. त्यामुळे जर तुम्ही आजच्या दिवशी तुम्ही सोनं-चांदी खरेदी करायचा विचार करत असाल हि एक चांगली संधी आहे. मुंबईत २४ कॅरेट आजचा सोन्याचा भाव ४९ हजार ४५० रुपये प्रति तोळा आहे. तर, मुंबईत चांदीचा भाव ६६ हजार रुपये प्रति किलोवर घसरला आहे. तर, मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा आजचा भाव ४८ हजार ४५० रुपये प्रति तोळा इतका आहे.

MCX वर सोने आणि चांदीची किंमत
एमसीएक्सवर आज सकाळी सोन्याची डिलिव्हरी दिसत असून फेब्रुवारी डिलीव्हरीसाठी सोन्याचा भाव दहा ग्रॅमसाठी ३९५ रुपयांनी घसरुन ४८,९१० रुपये झाला. त्याचप्रमाणे एप्रिलमध्ये सोन्याचा भाव १९६ रुपयांच्या वाढीसह प्रतितोळा ४९,२३० रुपयांवर होता. यावेळी चांदीच्या डिलीव्हरीत घट झाली आहे. मार्च डिलीव्हरीसाठी चांदीचा भाव ७२१ रुपयांनी घसरुन ६५,३०० रुपये प्रतिकिलो पातळीवर होता.

तुमच्या शहरात सोन्याचा आजचा भाव काय ?
मुंबई
सोने ४९,४५० रुपये प्रति तोळा
चांदी ६६,००० रुपये प्रति किलो

पुणे
सोने ४९,४५० रुपये प्रति तोळा
चांदी ६६,००० रुपये प्रति किलो

जळगाव
सोने५१,०२१ प्रति तोळा
चांदी ६६,९२३ प्रति किलो

नागपूर
सोने ४९,४५० रुपये प्रति तोळा
चांदी ६६,००० रुपये प्रति किलो

नाशिक
सोने ४९,४५० रुपये प्रति तोळा
चांदी ६६,००० रुपये प्रति किलो

कोल्हापूर
सोने ५०,९०० रुपये प्रति तोळा
चांदी ६५,३०० रुपये प्रति किलो

सरकार विकतंय स्वस्त सोनं
सॉवरेन गोल्ड बॉन्डची दहावी मालिकेंतर्गत ११ जानेवारी ते १५ जानेवारीदरम्यान यात गुंतवणूक करू शकता. यासाठी सेटलमेंटची शेवटची तारीख १९ जानेवारी आहे. दहाव्या मालिकेत जर कोणत्याही गुंतवणूकदारानं ऑनलाईन अप्लाय केल्यास डिजिटल मोडमध्ये पेमेंट केले जाते. त्यांना ५० रुपये प्रति ग्रॅम सूट मिळते. यासाठी रिझर्व्ह बँकेनं एक ग्रॅम सोन्याची किंमत ५१०४ रुपये ठेवली आहे.