Gold Price Today : सोन्याच्या किंमतीनं मोडले सगळे ‘विक्रम’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोन्याच्या किंमतीमध्ये आजही विक्रमी वाढ झाली आहे. जून महिन्यात तिसऱ्यांदा सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. सोमवारी देशभरातील सराफ बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅम 366 रुपयांनी वाढून 48660 रुपयांवर पोहचला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनची वेबसाईट सोन्या-चांदीची सरासरी किंमत अद्यावत करत असते. त्यांच्यामते 29 जून रोजी सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे.

आज 23 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 364 रुपयांनी वाढून 48 हजार 405 झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 336 रुपयांनी वाढून 44 हजार 518 रुपये झाले आहे. 18 कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील वाढ झाली असून दहा ग्रॅमसाठी 36450 रुपये दर झाला आहे.

इंडिया बुलिय अँड ज्वेलर्स असोसिएशन दिल्लीचे प्रभारी राजेश खोसला यांनी सांगितले की, देशभरातील 14 केंद्रांकडून सोन्या-चांदीची सरासरी किंमत दर्शवितल्या जात आहेत. सध्याच्या सोने-चांदीचा दर, स्पॉट किंमत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असू शकते परंतु त्यांच्या किमंतीमध्ये थोडा फरक आहे.