Gold Silver Price Today | सोन्या चांदीचे दर पुन्हा वधारले; जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today) सतत बदलत असतात. त्यानूसार आज सोन्या – चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज (मंगळवार) सोन्याच्या किंमतीत वाढ होऊन सोनं (Gold Price) 51,820 रुपयांवर ट्रेड करत आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) सोन्याच्या दरात 165 रुपयाची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात 461 रुपयाची वाढ झाली. सध्या चांदीचा दर (Silver Price) 68,810 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचला आहे.

 

मागील काही दिवसांपासून सोन्या – चांदीच्या दरात चढउतार होताना दिसत आहे. भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, मौल्यवान धातू मोठ्या वाढीसह ट्रेड करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 0.01 टक्क्यांच्या वाढीसह 1936.40 डॉलर प्रति औंस आहे. तसेच चांदी 0.36 टक्क्यांच्या वाढीसह 25.32 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करताना दिसत आहे.

 

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा भाव –
सोन्याच्या किंमती तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकणार आहात.

दरम्यान, सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी ‘BIS Care App’ चा वापर करू शकणार आहे.
या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता.
या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तात्काळ तक्रार करू शकतात. या अ‍ॅपद्वारे ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तात्काळ माहितीही मिळणार आहे.

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold and silver price increased on today 22 march 2022 check latest rate

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा