How To Get Pink Lips Naturally | गुलाबी आणि चमकदार ओठांसाठी करा ‘हे’ प्रभावी 5 नैसर्गिक उपाय; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – How To Get Pink Lips Naturally | गुलाबी ओठ (Pink Lips) मिळविण्यासाठी महिला अनेक प्रकारचे प्रॉडक्ट वापरतात. या प्रॉडक्टमध्ये अनेक विषारी आणि हानिकारक केमिकल्स (Toxic And Harmful Chemicals) असतात आणि त्यामुळे ओठांचे जास्त नुकसान (Lips Damage) होऊ शकते. काळे ओठ (Black Lips) धुम्रपान (Smoking), हायपरपिग्मेंटेशन (Hyperpigmentation) यासारख्या जीवनशैलीमुळे होऊ शकतात किंवा ते अनुवांशिक असू शकते. व्हिटॅमिनची कमतरता (Vitamin Deficiency), अ‍ॅलर्जी (Allergy) आणि खराब हवामानामुळेसुद्धा (Bad Weather) ओठ काळे होऊ शकतात (How To Get Pink Lips Naturally).

 

काही लोकांना ओठ काळे पडल्यामुळे अस्वस्थता जाणवते. जर तुम्हाला गुलाबी ओठ हवे असतील तर तुम्ही नैसर्गिक मार्गाने प्रयत्न करू शकता (How To Get Pink Lips Naturally).

 

गुलाबी ओठांसाठी हे नैसर्गिक उपाय वापरा (Natural Remedies For Pinky Lips) –

1. हळद आणि दूध (Turmeric And Milk)
हळद मेलेनिनचे उत्पादन रोखते आणि त्वचा उजळ करण्यास मदत करते. एक चमचा दुधात हळद मिसळा आणि पाच मिनिटे ओठांवर लावा. नंतर थंड पाण्याने धुवा.

 

2. लिंबू आणि साखर (Lemon And Sugar)
लिंबू आणि साखर ओठांना एक्सफोलिएट (Exfoliate) करण्यासाठी वापरली जाते. रात्री लिंबाचा रस काढा आणि त्यात थोडी साखर मिसळून ते ओठांना हळुवार चोळा आणि दुसर्‍या दिवशी सकाळपर्यंत राहू द्या.

 

3. खोबरेल तेल (Coconut Oil)
खोबरेल तेलामध्ये असे गुणधर्म असतात जे त्वचा मऊ आणि चमकदार (Skin Soft And Radiant) बनविण्यास मदत करतात.
तुमच्या ओठांवर खोबरेल तेलाने मसाज करा.

4. कोरफड (Aloe vera)
कोरफड त्वचेला उजळ करू शकते आणि ओठ उजळ देखील करू शकते कारण ती मेलेनिन अवरोधक म्हणून कार्य करते.
ओठांवर थोडा कोरफडचा गर लावा आणि कोरडा झाल्यावर कोमट पाण्याने धुवा.

 

5. बीट (Beetroot)
बीटमुळे ओठ गुलाबी होऊ शकतात. सोललेल्या बीटचा रस (Beetroot Juice) काढा. तो ओठांवर लावा 15 मिनिटे राहू द्या आणि नंतर धुवा.
ओठ हायड्रेटेड (Lips Hydrated) ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या (Drink Plenty Water).

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Web Title :- How To Get Pink Lips Naturally | how to make dark lips pink follow these 5 effective natural ways to get pink and glowing lips

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Natural Painkiller Remedies | विना साईडइफेक्ट्स ‘पेन किलर’चं काम करतात ‘या’ 7 गोष्टी, तुम्हाला माहित आहेत का?

 

Gold Price Today | आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण तर चांदी तेजीत, जाणून घ्या तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट

 

Narayan Rane | बंगल्यावरील ‘हातोड्या’ची कारवाई टाळण्यासाठी नारायण राणेंनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल