खुशखबर ! सोनं-चांदी झालं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रुपया भक्कम झाल्यामुळे या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत मोठी घसरणं झाली आहे. शुक्रवारी सराफ बाजारात सोने 232 रुपयांनी स्वस्त झाले. आज चांदीच्या किंमतीत देखील घसरणं झाली मात्र चांदी फक्त 7 रुपयांनी स्वस्त झाली. तज्ज्ञांच्या मते अमेरिका आणि चीन दरम्यान व्यापार करारावर सहमती होऊ शकते. यामुळे सोन्याच्या किंमतीत घसरणं दिसून येत आहे. कारण गुंतवणूकादार आता बाजारात गुंतवणूक करत आहेत.

सोन्याचे दर –
शुक्रवार दिल्लीत 24 कॅरेट सोनं 232 रुपयांनी घसरुण 38,486 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. गुरुवारी 99.9 शुद्ध सोन्याच्या किंमतीत 71 रुपयांनी वाढून 38,564 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले होते.

चांदीचे दर –
शुक्रवारी 1 किलोग्रॅम चांदी 45,196 रुपयांवरुन 45,189 रुपये झाले. आज चांदी 7 रुपयांनी स्वस्त झाली.

पुढे देखील स्वस्त होणार सोनं –
HDFC सिक्योरिटीचे सीनियर एनालिस्ट तपन पटेल यांनी सांगितले की भारतीय रुपयात मजबूती आल्याने सोन्याच्या किंमतीवर दबाव वाढला आहे. पुढील काही दिवस यात अशीच घसरणं सुरु राहिलं. त्यांचे म्हणणे आहे की व्यापार करारावर सहतमी होऊ शकते. त्यामुळे सोन्यांच्या किंमती कमी होत आहेत.

ब्रोकरेज हाऊस गोल्डमॅन सॅक्सने सोन्याच्या किंमतीत पुढील वर्षी तेजी येण्याची अपेक्षा ठेवली आहे. त्यांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1600 डॉलर प्रति औंसवर जाण्याची शक्यता आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like