Gold Silver Price Today | लग्नसराईच्या हंगामात सोन्या – चांदीच्या दरात तेजी; जाणून घ्या लेटेस्ट दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | मागील काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सातत्याने बदल होताना दिसत आहे. सध्या लग्नसराईचा सिजन सुरु आहे. अशातच आता सराफा बाजारात ग्राहकांची मागणी वाढताना दिसतेय. मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. आताही सोन्या चांदीचे दर वधारले असल्याचे दिसत आहे. आज (सोमवार) 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 53,332 रुपये झाला आहे. तर, चांदीचा भाव (Silver Price) 69,761 रुपये प्रति किलोवर आहे.

 

भारतीय सराफा बाजारात आणि आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात चढउतार दिसून येत आहे. सध्या जागतिक बाजारपेठेत दरात वाढ झाल्यामुळे भारतीय बाजारातही सोन्या – चांदीच्या किंमतीत वाढ झालीय. आज (सोमवारी) सकाळी सोन्याने एका महिन्याचा उच्चांक गाठला आहे. त्याचवेळी चांदीच्या भावातही 1 टक्क्यांची वाढ झाली आहे.

 

दरम्यान, वाढती महागाई आणि रशिया – युक्रेन युद्धामुळे (Russia – Ukraine War) सोन्याच्या दरात आणखी वाढ होऊ शकते. जगातील अनेक मोठ्या देशात महागाई शिगेला पोहोचलीय. यूएसमधील किरकोळ चलनवाढ सध्या 40 वर्षांच्या उच्चांकावर आहे आणि वाढत्या व्याजदरामुळे सोन्याच्या दरात देखील आणखी वाढ अपेक्षित आहे. जागतिक बाजारात दर वाढला तर त्याचा परिणाम डायरेक्ट भारतीय बाजारावर पडतो.

 

Web Title :-  gold price today 18 april gold silver price up today latest rates

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा