Gold Silver Price Today | सोन्या-चांदीचे दर वधारले; जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सतत बदल होत आहेत. मागील काही दिवस सोन्याच्या दरात चढउतार दिसून आली. मात्र, आज सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज (शनिवार) 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा 49,550 रुपये आहे. तर, चांदीचा भाव (Silver Price) 70,000 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

 

भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात साधारण घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या किमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळालं. दरम्यान आता पुन्हा सोन्या चांदीच्या दरात तेजी आल्याचे दिसत आहे. सध्या सोन्याचा दर 50 हजाराच्या आत आहे.

 

दरम्यान, दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

 

22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,550 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,060 रुपये

आजचा चांदीचा दर – 70,000 रुपये

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver price today 16th april 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा