Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत बदल नाही; जाणून घ्या आजचा भाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today) उतरताना दिसल्या. गेल्या दोन महिन्यापासून सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून सोने आणि चांदीचा भाव हा कमी आहे. तेव्हापासून आजतागायत सोन्या-चांदीचे दर स्थिर आहेत. आज (सोमवारी) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,680 रुपये आहे. तर चांदीची किंमत 62,200 रुपये प्रति किलो पर्यंत ट्रेड करत आहे.

गेल्यावर्षी सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price) वाढ झाली होती. गतवर्षी सोन्याचे दर 50 हजाराच्या वर होते. दरम्यान यंदा सोन्याचा दर 50 हजाराच्या आत आहे. त्यामुळे अनेक गुंतवणुकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळ आहे. यावर्षी सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ग्राहकांना योग्य संधी आहे. तर, मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत 47,690 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाली होती. दरम्यान आज सोन्याचा भाव 47,680 रुपये आहे.

दरम्यान, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. तर, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. (Gold Silver Price Today)

आजचा सोन्याचा दर –

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,800 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,800 रुपये

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,680 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,680 रुपये

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,680 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,680 रुपये

आजचा चांदीचा भाव – 62,200 रुपये (प्रति किलो).

Web Title :- Pune Crime | In Pune, a 14 year old boy sexually assaulted a 10 year old boy

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा