Gold Silver Price Today | खूशखबर ! आजही सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या नवीन दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | गेल्या दोन महिन्यापासून सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याचं (Gold Silver Price Today) पाहायला मिळालं. त्याचबरोबर चांदीच्या किंमतीत देखील घसरण होत आहे. आजही सोन्या-चांदीच्या दरात घसरण दिसून आले आहे. आज (शुक्रवारी) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 47,300 रुपये पर्यंत आहे. तर, चांदीची किंमत 62,300 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.

 

मागील दोन महिन्यापासून सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण झाल्याने सोनं स्वस्त झालं आहे. भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमती उतरत आहेत. त्यामुळे ग्राहकांना खरेदीसाठी सुवर्णसंधी आहे. गतवर्षी सोन्याच्या किंमतीने पन्नास हजाराची पातळी गाठली होती. यंदा तीच पातळी आता घटली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी योग्य संधी आहे. (Gold Silver Price Today)

 

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

काय आहे आजचा सोन्याचा भाव?

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,550 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,080 रुपये

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,300 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,300 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,300 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,300 रुपये

 

आजचा चांदीचा भाव – 62,300 रुपये (प्रति किलो).

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 24 december 2021 aaj che sonyache ani chandi che dar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | ‘चाकण’च्या हद्दीत भर चौकात कुस्ती तालीम चालवणारे पैलवान नागेश कराळे यांची गोळ्या झाडून हत्या; पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये प्रचंड खळबळ

Omicron Restrictions Maharashtra | राज्यात पुन्हा निर्बंध ! ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेऊन आज नवीन नियमावली जाहीर होणार

RBI | डेबिट आणि क्रेडिट कार्ड संदर्भातील महत्त्वाची बातमी ! आरबीआयने ‘तो’ निर्णय 6 महिने पुढे ढकलला; 1 जानेवारीपासून होणार होता लागू

PIB Fact Check | 31 डिसेंबरपर्यंत भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे का? जाणून घ्या या वायरल मेसजचे पूर्ण ‘सत्य’