PIB Fact Check | 31 डिसेंबरपर्यंत भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे का? जाणून घ्या या वायरल मेसजचे पूर्ण ‘सत्य’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PIB Fact Check | सोशल मीडियावर एक मेसेज तुम्ही पाहिलात का, ज्यामध्ये म्हटले आहे की भारत सरकारने 31 डिसेंबरपर्यंत भारत बंदची घोषणा केली आहे. जर पाहिला असेल, तर हे जाणून घ्या की हा मेसेज पूर्णपणे बनावट आणि खोटा आहे. या मेसेजवर अजिबात विश्वास ठेवू नका. PIB फॅक्ट चेकने ही (PIB Fact Check) माहिती दिली आहे.

 

PIB फॅक्ट चेकने ट्विट करून म्हटले आहे की, सोशल मीडियावर वायरल एक बनावट छायाचित्रात दावा केला जात आहे की, 31 डिसेंबरपर्यंत भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे.

 

या ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, केंद्र सरकारने लॉकडाऊनसंबंधी अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. कृपया असे संभ्रम निर्माण करणारे छायाचित्र किंवा मेसेज शेयर करूनका. यासाठी जर तुम्ही सुद्धा व्हॉट्सअप किंवा एखाद्या दुसर्‍या मेसेजिंग अ‍ॅप किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असे छायाचित्र पाहिले तर, तर यापासून सावध व्हा. (PIB Fact Check)

PIB फॅक्ट चेकने म्हटले फेक न्यूज
ही बातमी पूर्णपणे खोटी आणि बनावट आहे. ही काही खोडकर लोकांनी पसरवलेली अफवा किंवा फेक न्यूज आहे. यापासून अतिशय सावध राहा. हा मेसेज पुढे शेयर करू नका. यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये अफवा आणि गोंधळ पसरू शकतो.

 

सोशल मीडियावरील कोणतीही माहिती सरकारच्या अधिकृत प्लॅटफॉर्मवर चेक करा. PIB फॅक्ट चेकने आपल्या ट्विटर हँडलवर या बनावट छायाचित्राचा स्क्रीनशॉट शेयर केला आहे. हे छायाचित्र एखाद्या न्यूज चॅनलसारखे दिसत आहे.

 

Web Title :- PIB Fact Check | fact check fake news circulating of bharat bandh lockdown in india till 31 december

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात कोरोना’च्या 1179 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Omicron Covid Variant | राज्यात आज ओमायक्रॉनचे 23 नवे रुग्ण ! पुण्यात सर्वाधिक13, मुंबईत 5, उस्मानाबादमध्ये 2, ठाणे तसेच नागपूर आणि मिरा भाईंदरमध्ये प्रत्येकी 1 नवीन रुग्ण

Honda Activa | फक्त 9 हजारांमध्ये आता मिळेल 60 kmpl मायलेजची देशातील बेस्ट सेलिंग Honda Activa ची प्रीमियम एडिशन