RBI | डेबिट आणि क्रेडिट कार्ड संदर्भातील महत्त्वाची बातमी ! आरबीआयने ‘तो’ निर्णय 6 महिने पुढे ढकलला; 1 जानेवारीपासून होणार होता लागू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – RBI | डेबिट (Debit) आणि क्रेडिट कार्ड सुरक्षित (credit card secured) बनविण्यासाठी आरबीआयने (RBI) टोकनायझेशनचा (Tokenization) निर्णय घेतला होता. आरबीआय (RBI) टोकनायझेशनचा निमय 1 जानेवारी 2022 पासून लागू करणार होती. मात्र, आता हा निर्णय सहा महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आला असून आता हा निर्णय 30 जून 2022 नंतर लागू केला जाणार आहे.

 

नोकटायझेशन म्हणजे काय?
आरबीआय (RBI) द्वारे एटीएम (ATM),डेबिट, क्रेडिट कार्ड सुरक्षित करण्यासाठी ही व्यवस्था केली होती. कोणतीही कंपनी किंवा व्यापारी कार्ड क्रमांक (Business card number), एक्सपायरी डेट (Expiry date) किंवा CVV सारखी ग्राहकाच्या डेबिट, क्रेडिट कार्डची माहिती साठवू शकत नाही. आरबीआयने अ‍ॅमेझॉन (Amazon), फ्लिपकार्ट (Flipkart), झोमॅटोसह (Zomato) सर्व कंपन्यांना ग्राहकांचा सेव्ह केलेला डेटा कधीच (Save data) डिलीट करण्यास सांगितले आहे. जेणेकरून ऑनलाईन व्यवहारांची सुरक्षितता वाढवता येईल. त्याच वेळी आरबीआयने Visa, Mastercard आणि Rupay ला कार्ड जारी करणाऱ्या बँका किंवा कंपनी यांच्यावतीने टोकन जारी करण्याची परवानगी दिली आहे, ज्याला टोकनायझेशन असे म्हटले जाते.

कार्डचा तपशील साठवला जाणार नाही
अशाप्रकारे ग्राहकांच्या कार्डचा डेटा व्यापाऱ्यांकडे साठवला जाणार  नाही. ज्यामुळे डेटा चोरी किंवा फसवणुकीच्या (fraud) घटना होणार नाहीत. कार्ड टोकनायझेशन ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये कार्ड माहिती कोड किंवा टोकनने बदलली जाते. तसेच आवश्यक माहिती उघड न करता व्यवहार करण्यास परवानगी दिली जाते. भारतात टोकनायझेशन संकल्पना आधीच युनायटेड पेमेंट इंटरफेस (UPI) मध्ये वापरली जाते. यामुळे, ही सर्वात सुरक्षित पेमेंट प्रणाली पैकी एक आहे.

 

Web Title :- RBI | atm debit credit card tokenisation rbi postpones decision 6 months implemented january 1

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PIB Fact Check | 31 डिसेंबरपर्यंत भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे का? जाणून घ्या या वायरल मेसजचे पूर्ण ‘सत्य’

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात कोरोना’च्या 1179 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Omicron Covid Variant | राज्यात आज ओमायक्रॉनचे 23 नवे रुग्ण ! पुण्यात सर्वाधिक13, मुंबईत 5, उस्मानाबादमध्ये 2, ठाणे तसेच नागपूर आणि मिरा भाईंदरमध्ये प्रत्येकी 1 नवीन रुग्ण