Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या लेटेस्ट दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) चढउतार होताना दिसून आली. मागील दोन ते तीन दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, सध्या सोन्या चांदीच्या किंमतीत पुन्हा घसरण झाल्याचे दिसते. आज (रविवारी) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 45,100 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 61,000 रुपये पर्यंत ट्रेड करत आहे.

 

आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत सध्या घसरण झाल्याचं दिसत आहे. मागील दोन दिवसापासून सोन्या चांदीच्या दरात वाढ दिसून आली. त्यानंतर सध्या सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात किंचित घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याचा दर कमीच आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी योग्य संधी आहे. (Gold Silver Price Today)

 

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

 

आजचा सोन्याचा दर –

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,050 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,060 रुपये

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,100 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,200 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,100 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,200 रुपये

आजचा चांदीचा भाव – 61,000 रुपये (प्रति किलो)

 

Web Title :-  Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 6 february 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा