Lata Mangeshkar Net Worth | लता मंगेशकर यांची संपत्ती किती? जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Lata Mangeshkar Net Worth | वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी आपल्या संगीत कलेच्या करीअरची सुरुवात करणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं आज (दि. 6 फेब्रुवारी) सकाळी 8.12 वाजता मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) उपचारादारम्यान निधन झालं. लता मंगेशकर या 92 वर्षाच्या होत्या. लतादीदींना कोरोना आणि न्यूमोनिया झाल्याने मागील अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. (Lata Mangeshkar Net Worth)

 

लता मंगेशकर गाण्यासाठी जगभर प्रसिद्ध होत्या. दरम्यान, लतादीदींची एकूण संपत्ती किती आहे. याबाबत तुम्हाला माहिती आहे का? तर लतादीदींची एकूण संपत्ती 368 कोटी रुपये आहे. 28 सप्टेंबर रोजी जन्मलेल्या लता मंगेशकर यांनी आपल्या आवाजाने सगळ्या जगात आपला एक वेगळा ठसा उमटविला आहे. गोड आवाजातील गाणी रसिकांच्या कायम स्मरणात राहतील अशी त्यांची ओळख आहे. लतादीदींनी जगभरातील 36 भाषांमध्ये 50 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. आपल्या आवाजाच्या माध्यमातून भारताचे नाव जगात उंचावणाऱ्या लतादीदींना सन 2001 मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार (Bharat Ratna Award) देण्यात आला होता. (Lata Mangeshkar Net Worth)

 

लतादीदींचे वडील दीनानाथ मंगेशकर (Deenanath Mangeshkar) हे मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध संगीतकार, शास्त्रीय गायक आणि नाट्य अभिनेते होते, तर आई गुजराती होती. लतादीदींनी लहानपणापासूनच वडिलांकडून संगीताचे धडे घेतले होते. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे लतादीदींना लहान वयातच घराची आर्थिक जबाबदारी सांभाळावी लागली. यासाठी त्यांनी गाणी गाण्यास सुरुवात केली होती.

 

 

लतादीदींना पहिली संधी 1942 साली ‘किती हसाल’ या मराठी चित्रपटातील गाण्यानं मिळाली होती.
तर पहिली मंगळागौर या चित्रपटात त्यांनी अभिनयही केला होता.
त्यांना मास्टर गुलाम हैदर यांच्या ‘मजबूर’ चित्रपटातील ‘इंग्लिश छोरा चला गया’ या गाण्यात प्रसिद्ध गायक मुकेशसोबत गाण्याची संधी मिळाली होती.

दरम्यान, लतादीदींना पहिल्या गाण्यासाठी मानधन मिळालं होतं ते होतं केवळ 25 रुपये.
आज त्यांची संपत्ती काही कोटींच्या घरात आहे. Trustednetworth . com च्या अहवालानुसार, लतादीदी यांची एकूण संपत्ती सुमारे 5 कोटी डॉलर्स इतकी आहे
म्हणजेच अंदाजे 368 कोटी रुपये आहे. गाण्यांच्या रॉयल्टीतून आणि अन्य गुंतवणुकीतून त्यांची ही संपत्ती निर्माण झाली आहे.
लतादीदी यांचे दक्षिण मुंबईतील पेडर रोडवर प्रभु कुंज भवन (Prabhu Kunj Bhavan) नावाचे घर आहे. या घराची किंमत करोडोंमध्ये आहे.

 

Web Title :- Lata Mangeshkar Net Worth

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा