सोन्याचांदीला पुन्हा झळाळी ! सोनं 250 रुपयांनी तर चांदी 360 रुपयांनी महागली, जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑलाइन – गेल्या काही दिवसापासून सातत्याने सोन्या-चांदीच्या किंमतीत चढ- उतार पाहायला मिळत आहे. गुरुवारी (दि. 8) संध्याकाळी बाजार बंद होताना सोन्याच्या किंमतीत 250 रुपयांची तर चांदीच्या किंमतीत 360 रुपयांची वाढ झाली आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 44,550 रुपये इतका झाला आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 45,550 रुपये झाला आहे.

24 मार्च रोजी सोन्याची किंमत 1020 रुपयांनी वाढली होती. त्यानंतर मंगळवारी 640 रुपयांची वाढ झाली आहे. गुरुवारी पुन्हा एकदा 250 रुपयांची वाढ झाली आहे. अन्यथा इतर दिवशी सोन्याच्या किंमतीत सातत्याने घट झाली आहे. गेल्या महिन्यात, 28 फेब्रुवारीला सोन्याचा भाव हा 45,930 रुपये इतका होता. तर 31 मार्चला तो 44,370 रुपये इतका होता.

तर चांदीच्या दरात बुधवारच्या तुलनेत 360 रुपयांची वाढ झाली आहे. शुक्रवारी सकाळी हा दर 66,660 रुपये इतका आहे. गुरुवारी संध्याकाळी हा दर 66,300 रुपये इतका होता. चांदीच्या भावाचा विचार करता गेल्या दहा दिवसात या दरात चढ-उतार दिसत आहे. गेल्या 28 फेब्रुवारीला एक किलो चांदीचा भाव हा 67,500 इतका होता, तर 31 मार्चला तो 65,500 रुपये इतका होता. दरम्यान, मागील काही दिवसांपासून सोन्याच्या भावात सातत्याने होणारी घसरण पाहता सोन्यात गुंतवणूक करणा-यांची संख्या वाढली आहे.