सोन्या चांदीच्या किंमतीत घसरण, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्त संस्था – शुक्रवारी सोन्या चांदीच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाली. सोने पुन्हा एकदा ४० हजार रुपयांच्या पातळी खाली आले तर चांदीची किंमतही ५० हजार रुपयांच्या खाली गेली. हा परिणाम ज्वेलर्सच्या मागणीत घट झाल्याने दिसून आला आहे. सोने ३७२ रुपये प्रतीतोळा तर चांदी २,७०० प्रतिकिलोने घसरली आहे.

हा आहे सोन्याचा भाव :

सोन्याचा भाव प्रतितोळा ३७२ रुपयांनी घसरून ३९,२७८ रुपयांवर आला. १९ ऑगस्टनंतरची ही सोन्याची सर्वात कमी किंमत असून मागील १५ दिवसांत ते ८९० रुपयांनी घसरून ३९,५८० रुपये प्रति दहा ग्रॅमवर गेले. बाजार बंद होताना सोन्याचे बिटर देखील ३९,४१० रुपये प्रति १० ग्रॅम होते. गिन्नीचा भाव १०० रुपयांनी घसरून ३९,६०० रुपयांवर आला.

चांदीचा भाव :

जागतिक दबावामुळे चांदीची किंमत घसरली. चांदीचे भाव २,७०० रुपयांनी घसरून ४८,६०० रुपये प्रतिकिलोवर आले. चांदीचा वायदा दर १,१५० रुपयांनी घसरून ४८,००० रुपयांवर आला. नाणे खरेदी व विक्रीही २०-२० पैशांनी खाली येऊन अनुक्रमे १,०३० आणि १,०४० रुपये झाली.

जागतिक बाजारातील परिस्थिती :

परदेशातून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सोन्याच्या भावात दोन टक्क्यांनी आणि चांदीमध्ये पाच टक्क्यांनी घसरण झाली. हा क्रम आजही कायम आहे. सोन्याचे हाजीर १०.४५ डॉलरने कमी होऊन प्रति औंस १५०७.७५ डॉलरवर आला. ट्रेडिंग दरम्यान एका वेळी तो १५०४.३० वर घसरला होता, जी २३ ऑगस्टनंतरची नीचांकी पातळी आहे.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, कमकुवत गुंतवणूकीची मागणी आणि मजबूत रुपया यामुळे किंमती खाली आल्या. शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपया २१ पैशांनी मजबूत झाला.

पटेल म्हणाले, अमेरिकेच्या अपेक्षेपेक्षा जास्त आकडेवारीनंतर बाजारात जोखीम कमी होण्याने सराफा मागणीवर परिणाम झाला. गुरुवारी संध्याकाळी सराफाच्या किंमतीत तांत्रिक सुधारणा झाली आणि मौल्यवान धातूंच्या किंमती खाली आल्या.