Gold-Silver Rate Today | सोन्याचा भाव स्थिर तर, चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold-Silver Rate Today | आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत आहे. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची (22 Carat Gold) आजची किंमत 47,090 रुपये (Gold-Silver Rate Today) आहे. मागील ट्रेडमध्ये सोन्याची किंमत 47,090 रुपये प्रति 10 ग्रॅमवरच बंद झाली होती. गुड रिटर्न्स (Good Returns) या वेबसाईटनुसार चांदी (Silver) 61,700 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क (Excise Duty), राज्य कर (State Tax) आणि मेकिंग शुल्कामुळे (Making Fee) सोन्याच्या दागिन्यांची (Gold Jewelry) किंमत देशात बदलते.

 

काय आहे आजचा भाव ?
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये (Mumbai) 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,090 रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याच्या दरात वाढ होऊन आजची किंमत 49,090 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. पुण्यामध्ये (Pune) प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 46,320 आहे तर 24 कॅरेटचा आजचा भाव 48,840 प्रति 10 ग्रॅम आहे. नागपूरमध्ये (Nagpur) प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,090 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 49,090 रुपये इतका आहे. चांदीचा आजचा प्रति 10 ग्रॅमचा दर 617 रुपये आहे.

सोन्याचा दर कसा ठरतो ?
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क (Hallmark) केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. (Gold-Silver Rate Today)

 

सोन्याची शुद्धता कशी ओळखावी
24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध परंतु पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने तयार करणे शक्य नाही. सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेणार असाल तर तुम्हाला हे माहित पाहिजे की, 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. सोन्याच्या शुद्धतेसाठी 5 प्रकारचे हॉलमार्क असून ते दागिन्यांवर असतात.

 

Web Title :- Gold-Silver Rate Today | gold silver rate in india today on 19 january 2022 sonyache dar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा