खुशखबर ! सोन्याचे दर उतरले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ऐन लग्नसराईत सोन्याची किंमत जवळपास दीड हजारांनी उतरली असून ३२,५०० रुपये प्रतितोळा झाली आहे. त्यामुळे सराफ बाजारात सोने खरेदीला उधाण येण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांमध्ये या किमतीत अजून घट होईल, असा अंदाजही शेअर तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

सराफ बाजारात ३४ हजार रुपयांचा आकडा गाठणाऱ्या सोन्याच्या किमतीत घट झाली आहे. २० फेब्रुवारी रोजी सराफ बाजारात सोन्याची किंमत ३४,९७५ प्रतिततोळा इतकी होती. त्यानंतर मार्च महिन्यात ३४ ते ३३ हजारांच्या दरम्यान आकडा कमी जास्त होत होता.

या कारणामुळे किमतीत घट –

आंतरराष्ट्रीय बाजारात रुपया वधारला आहे.
शेअर बाजारात आलेल्या तेजीनंतर गुंतवणूकदार सोन्यातील गुंतवणूक कमी झाली आहे.
स्थानिक सराफांकडून सोन्याची मागणी घटली आहे.
तसेच डॉलरची किंमतही इतर चलनांच्या तुलनेने घसरत आहे. या सगळ्यांचा परिणाम म्हणून सोन्याची किंमत घटली आहे. या किमती अजूनही घटण्याची शक्यता आहे.