न शिजवताच तयार होईल भात, तेलंगनाच्या शेतकर्‍याचा महत्वाचा शोध, जाणून घ्या काय आहे नाव ?

करीमनगर : वृत्तसंस्था – तेलंगनाच्या करीमनगरच्या एका शेतकर्‍याने शेतीशी संबंधीत एक नवीन शोध लावला आहे. त्याने तांदळाची एक अशी जात शोधून काढली आहे, जो खाण्यासाठी शिजवण्याची आवश्यकता नाही. तांदूळ काही वेळासाठी पाण्यात भिजवून ठेवले की काम झाले. जर तुम्हाला गरमागरम भात खायचा असेल तर तो गरम पाण्यात भिजवू शकता. अन्यथा सामान्य पाण्यात भिजवून खाल्ला तरी सुद्धा तसाच तयार होतो.

करीमनगरच्या श्रीराममल्लापल्ली गावातील शेतकरी श्रीकांत यांचे म्हणणे आहे की, त्यांना एकदा आसाममध्ये जाण्याची संधी मिळाली होती. तिथे तांदळाच्या अशा जातीची माहिती मिळाली जो न शिजवता खाता येऊ शकतो. त्यांनी गुवाहाटी विद्यापीठाशी संपर्क करून तांदळाच्या या आनोख्या प्रजातीची माहिती घेतली. यानंतर त्यांना समजले की, आसामच्या पर्वतीय भागात काही आदीवासी अशाप्रकारचे धान्य पिकवतात, जे खाण्यासाठी शिजवण्याची आवश्यकता नाही.

हाय फायबरने युक्त आहेत तांदूळ
पर्वतीय आदीवासी परिसरात अशाप्रकारच्या तांदळाला बोकासौल नावाने ओळखले जाते. तांदळाचा हा प्रकार आरोग्यासाठी अतिशय गुणकारी मानला जातो. या तांदळात 10.73% फायबर आणि 6.8% प्रोटीन आहे. शेतकरी श्रीकांत यांनी सांगितले की, या तांदळाची भात गुळ, केळे आणि दह्यासोबत चव अतिशय स्वादिष्ट असते.

अर्ध्या एकरात 5 गोणी तांदळाचे उत्पादन
श्रीकांत आसामच्या आदीवासी परिसरातून या प्रकाराच्या तांदळाचे बियाणे घेऊन आले होते. 12व्या शतकात आसाममध्ये राज्य करणार्‍या प्रमुख राजघराण्याला बोकासौल तांदूळ खुप आवडत होते. परंतु नंतर तांदळाच्या दुसर्‍या जातींची मागणी वाढत गेली. शेतकरी श्रीकांत यांनी सांगितले की, जवळपास नामशेष झालेल्या तांदळाच्या या प्रकाराला विकसित करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि अर्धा एकर शेतात पेरणी केली. श्रीकांत यांना आशा होती की, अर्ध्या एकरमध्ये सुमारे 5 गोणी तांदळाचे उत्पादन होईल. दूसर्‍या जातींप्रमाणेच हे पिक 145 दिवसात तयार होते.

हे तांदूळ उपयोगी आहेत का ?
श्रीकांत यांनी म्हटले की, सध्याच्या काळात या तांदळाची आवश्यकता समजू शकते. विशेष करून स्वयंपकाच्या गॅसचे दर सतत वाढत आहेत. त्यांनी म्हटले की, कृषीतज्ज्ञ सुभाष पालेकर त्यांच्यासाठी प्रेरणा आहेत, ज्यांनी नैसर्गिक शेतीचे संशोधन केले होते. असे तंत्रज्ञान विकसित केले, ज्यामध्ये शेतीसाठी कोणत्याही रासायनिक किटनाशकचा वापर करावा लागत नाही आणि बाजारातून इतर औषधे विकत आणावी लागत नाहीत.