Coronavirus vaccine : देशात लवकरच लसीकरणाला सुरुवात, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची माहिती

पोलीसनामा ऑनलाईनः देशात लवकरच कोरोना प्रतिबंध लसीकरणाला (Corona prevention vaccination) सुरुवात केले जाणार असून त्यासाठी आवश्यक असणारी पूर्वतयारी केंद्र सरकार राज्य सरकारांच्या मदतीने केली जात असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन (Union Health Minister Dr. Harshavardhana) यांनी ही माहिती दिली आहे. यात पहिल्या टप्प्यात 30 कोटीला जनतेला लस दिली जाणार असून त्याचा प्राधान्यक्रम निश्चित केला असल्याचे ते म्हणाले.

डॉ. हर्षवर्धन म्हणाले, तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर सरकारने प्राधान्यक्रम ठरवला असून त्यानुसार देशातील 30 कोटी जनतेला लस देण्यात येणार आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी, पोलीस, सैन्य आणि स्वच्छता कर्मचारी, 50 पेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्ती तसेच 50 वयापेक्षा कमी असलेल्या पण विशिष्ट आजारांनी त्रस्त असलेल्या व्यक्ती या लोकांचा या प्राधान्यक्रमामध्ये समावेश आहे.

 

 

 

 

 

 

 

 

प्राधान्यक्रमाच्या यादीतील प्रत्येकाला लस मिळावी असा आमचा प्रयत्न आहे. जर एखाद्याने ठरवले की त्याला लस नको आहे तर आम्ही त्याला जबरदस्ती करणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले. पोलिओचे निर्मूलन करणे वैज्ञानिकदृष्ट्या शक्य होते. त्याप्रमाणेच शेवटी कोरोनाचा संसर्ग देखील कमी होईल आणि हा आजारही साधारण होऊन जाईल, असा विश्वासही डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

चार महिन्यांपासून लसीकरणाची तयारी सुरु
डॉ. हर्षवर्धन म्हणाले, केंद्र सरकारकडून राज्य सरकारच्या मदतीने लसीकरण मोहिमेची तयारी असून यासाठी गेल्या चार महिन्यांपासून जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर तयारी सुरु आहे. यासाठी टास्कफोर्स नेमले आहेत. मोहिमेसाठी हजारो लोकांना देशभरात प्रशिक्षण देण्यात आले आहे. सध्या राज्य स्तरावर प्रशिक्षण मोहिम सुरु असून याअंतर्गत 260 जिल्ह्यांमधून 20, 000 हजार कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.