भारतात यावर्षी सर्वात जास्त काय सर्च करण्यात आले ? ’कोरोना’ नव्हे…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Google 2020 Year in Search : गुगल जगातील सर्वात पॉप्युलर आणि सर्वात जास्त यूज करण्यात येणारे सर्च इंजिन आहे. प्रत्येक वर्षाच्या अखेरीस कंपनी ईयर इन सर्च जारी करते. यामध्ये सांगितले जाते की, वर्षभरात गुगलवर लोकांनी काय सर्च केले आहे.

भारतासाठी सुद्धा गुगलने 2020 ईयर इन सर्च जारी केले आहे. या लिस्टमध्ये यावर्षी भारताने केलेल्या टॉप सर्चपासून टॉपिक्स, इव्हेंट्स, लोक आणि ठिकाणाबाबत माहिती दिली आहे.

गुगलच्या लिस्टमध्ये काही हैराण करणार्‍या गोष्टी सुद्धा आहेत. असंख्य सर्च क्वेरी आणि लिस्टमध्ये कुठेही सुशांत सिंह राजपूतचे नाव नाही, पण यावर्षी अनेक महिन्यांपर्यंत सोशल मीडियावर सुशांत सिंह राजपूत ट्रेंड करत होता.

गुगलने ग्लोबल डेटा सुद्धा जारी केला आहे, ज्याद्वारे समजते की, जगभरात सर्वात जास्त सर्च कोरोना बाबत करण्यात आला, परंतु भारतात असे झालेले नाही.

भाारतात लोकांनी हे केले सर्वात जास्त सर्च
हैराण करणारी बाब ही आहे की, जिथे जगभरात कोरोनाबाबत सर्च करून लोक माहिती घेत होते, तर भारतात मात्र कोराना व्हायरस टॉप सर्च क्वेरीमध्ये नाही, उलट आयपीएल बाबत लोकांनी जास्त सर्च केले आहे.

* यावर्षी गुगल सर्चमध्ये इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) भारतात टॉप सर्च क्वेरी होती.

* टॉप ट्रेंडिंग पर्सनॅलिटीज बाबत तर चक्क जो बायडेन आणि अर्णब गोस्वामीचे नाव आहे.

* 2020 च्या टॉप ट्रेंडिंग चित्रपटांमध्ये नंबर-1 वर दिल बेचारा, सूरारी पोट्टरू टॉप वर होते.

* वेब सीरीजमध्ये यावर्षी भारतात लोकांनी सर्वात जास्त मनी हिस्ट आणि 1992 : द हर्षद मेहता स्टोरी बाबत सर्च केले आहे.

* गुगलनुसार या वर्षी लोकांनी कोरोना व्हायरसबाबत खुप काही सर्च केले आहे. परंतु याशिवाय आयपीएलबाबत क्रेझ होती आणि आयपीएल टॉप ट्रेंडिंग क्वेरी ठरली आहे.

* कोरोना व्हायरस आणि आयपीएलशिवाय लोकांनी भारतात अमेरिकन प्रेसिडेंशियल इलेक्शनबाबत सुद्धा खुप सर्च केले आहे. याशिवाय दिल्ली इलेक्शन आणि बिहार इलेक्शन सुद्धा सर्च केले आहे. टॉप ट्रेंडिंग चार्टमध्ये पंतप्रधान किसान स्कीम सुद्धा आहे.

पर्सनॅलिटी
ट्रेडिंग पर्सनॅलिटीमध्ये अमेरिकी प्रेसिडेंट एलेक्ट जो बायडेन यांच्यानंतर न्यूज अँकर अर्णब गोस्वामीचा नंबर आहे. यानंतर कनिका कपूरचा नंबर आहे, ज्यांना लोकांनी सर्वात जास्त सर्च केले आहे.

बॉलीवुड अ‍ॅक्टर अमिताभ बच्चन, कंगना राणावत, रिया चक्रवर्ती आणि अंकिता लोखंडे सुद्धा टॉप सर्चमध्ये होते. भारतात दुसर्‍या इंटरनॅशनल पर्सनॅलिटीच्या लिस्टमध्ये किम जोंग उन यांच्यासह अफगाणिस्तानचा क्रिकेटर रशिद खानचे सुद्धा नाव आहे.

चित्रपट
दिल बेचारा यावर्षी सर्वात जास्त सर्च करण्यात आलेला चित्रपट ठरला आहे, तर दुसर्‍या नंबरवर तामिळ अ‍ॅक्शन चित्रपट सूरारी पोट्टरू होता. याशिवाय तानाजी, शकुंतला देवी आणि गुंजन सक्सेनाच्या बायोपिक बाबत लोकांनी सर्च केले आहे.

सर्च टर्म
गुगलनुसार सर्वात आश्चर्यकारक सर्च टर्म हाऊ टू आणि व्हॉट इज च्या आसपास आहे. या सर्च क्वेरी हे दर्शवतात की लोक कोरोना व्हायरस महामारीत वर्क फ्रॉम होमच्या दरम्यान हे सर्च करत होते.