मजेदार ! गूगलवर ‘भिखारी’ असे सर्च केल्यास येते पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांची प्रतिमा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या भारताच्या निर्णयाने पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. त्यांनी भारताच्या या निर्णयाविरोधात जागतिक स्तरावर निषेध नोंदवत रान पेटवण्याचा प्रयत्न केला. पण जवळपास सर्वच देशांकडून त्यांना निराशा मिळाली असून सर्वानीच दुर्लक्ष केले आहे. कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानने जागतिक रंगमंचावर स्वतःची नाचक्की करून घेतली. आता पाक पंतप्रधान इम्रान खान यांची सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडवली जात आहे.

दरम्यान, गुगलवर भिखारी असे सर्च केल्यास पाकिस्तानच्या प्रधानमंत्री इम्रान खानचे चित्र दिसते. हे चित्र फोटोशॉप च्या मदतीने एडिट केले गेले असून त्यात इम्रान खानच्या हातात एक वाटी देखील आहे. खरे पाहता पंतप्रधान इम्रान पाकिस्तानला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी जगातील अनेक देशांकडून कर्ज घेण्यासाठी धावत आहेत. याचाच धागा पकडून हे चित्र व्हायरल होत असल्याचे बोलले जात आहे.

पाकिस्तान सरकारने मात्र यास भारताचे षडयंत्र म्हणत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तान सरकारने गुगलकडे तक्रार देखील केली आहे. हा प्रकार केवळ पंतप्रधान इम्रान खान यांच्या प्रतिमेलाच नव्हे. तर संपूर्ण पाकिस्तानला नुकसान पोहोचवित असल्याचे पाक सरकारचे म्हणणे आहे. यावर पाक सरकारने गुगलला तात्काळ कारवाई करुन लवकरात लवकर चित्र काढून टाकण्याचे आवाहन केले आहे.

यापूर्वी पाकिस्तान वृत्तवाहिनी पीटीव्हीने मोठी चूक केली होती. नोव्हेंबरमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांनी जेव्हा चीनमध्ये भाषण दिले तेव्हा चॅनेलने हे सर्व थेट दर्शविले. त्या वेळी, चॅनेलने चीनची राजधानी बीजिंगला “Begging (भीक मागणे)” असे लिहिले होते. त्यानंतर सरकारने त्या कार्यक्रमाशी संबंधित बर्‍याच लोकांना कामावरून काढून टाकले होते. सोशल मीडियावर याची खिल्लीही उडवली गेली.

नुकतेच अमेरिकेच्या खासदारांनी या प्रकरणावर गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांच्यासमोर बरेच प्रश्न उपस्थित केले होते. डोनाल्ड ट्रम्प यांची बाबही त्यांनी समोर ठेवली. पिचाई यांच्या म्हणण्यानुसार गूगलचा अल्गोरिदम याला जबाबदार आहे. ज्यानुसार एखाद्या व्यक्तीसंदर्भात वारंवार केलेला एखाद्या शब्दाचा वापर त्या व्यक्तीचे संबोधन नाव म्हणून मानते.

म्हणजेच याचे कारण असेही आहे की, जर जगभरातील लोकांनी इम्रान खान यांच्या च्या प्रतिमेसमवेत भिखारी हा शब्द बर्‍याचदा वापरला असेल तर मग भिखारी हा शब्द शोधताना त्याचा चित्र येत असावे.

आरोग्यविषयक वृत्त –