मदत करण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यालाच गुंडाची शिवीगाळ आणि धक्काबुक्की

पिंपरी-चिंचवड : पाेलीसनामा ऑनलाईन: शहरातील सांगवी पोलीस ठाण्याच्या परिसरात पोलीस कर्मचाऱ्यालाच एका गुंडाने धक्काबुकी केल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमंतकुमार प्रकाश गुत्तीकोंडा असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून राकेश वामन आवळे असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0ff24139-d37c-11e8-b7f3-9be655c3e5d5′]

सविस्तर माहिती अशी, गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास फिर्यादी पोलिस कर्मचारी गुत्तीकोंडा हे साई चौकातील हॉटेल मध्ये जेवण करत होते. त्यावेळी रक्ताच्या थारोळ्यात आरोपी राकेश वामन आवळे हे बाहेर दिसले. तेव्हा गुत्तीकोंडा हे कर्तव्य बजावण्यासाठी बाहेर आले नेमका काय प्रकार झाला आहे विचारणा केली, मात्र आरोपीने उलट प्रश्न करत तू कोण आहेस असं म्हणत शिवीगाळ करत शर्ट पकडला या झटापटीत पोलीस कर्मचारी गुत्तीकोंडा यांच्या शर्टची बटणे तुटली.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’14f49a61-d37c-11e8-8eb8-79df27d7d210′]

परंतु मदत करण्यास गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यालाच धक्काबुक्की केली गेल्याने आरोपीला तातडीने पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आले. दरम्यान आरोपी गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एस सूर्यवंशी हे करीत आहेत.