मी दोन मिनिटे बोललो आणि भारताने दुचाकीवरील कर निम्मा केला : ट्रम्प

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फक्त दोन मिनिटात भारताने दुचाकींवर लावलेला कर ५० टक्क्यांनी कमी केला असे वक्तव्य केले. ट्रम्प यांनी हे वक्तव्य व्हाईट हाऊसमध्ये खासदारांशी संवाद साधताना केले. त्यांनी समप्रमाणात कर या संदर्भात खासदारांशी संवाद साधला होता.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये खासदारांशी दोन देशातील समप्रमाणात कर आकारणीसंदर्भात बोलत होते. यावेळी त्यांनी अमेरिकेतून आयात करण्यात येणाऱ्या दुचाकी गाड्यांवर भारताने लावलेल्या कराचे उदाहरण दिले. त्यांनी ‘अमेरिकेतून आयात होणाऱ्या दुचाकी वाहनांवर भारत आधी १०० टक्के कर आकारत होता. पण, मी फक्त दोन मिनिटे याच्यावर बोलल्यानंतर हा कर ५० टक्के कमी झाला. पण, अजूनही भारताचा कर ५० टक्के आहे आणि अमेरिका २.४ टक्के कर आहे. तरीही ही एक फेअर डिल आहे.’ गेल्या वर्षी ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केल्यावर भारतातने हार्ले डेव्हिडसन सारख्या अमेरिकेतून आयात करण्यात येणाऱ्या दुचाकी गाड्यांवर आकारण्यात येणारा कर १०० टक्यांवरून ५० टक्के केला होता.

ट्रम्प यांनी जरी भारताने दुचाकी गाड्यांवरील कर कमी करण्यात आला असला तरी भारत आयात करण्यात येणाऱ्या वाईन, व्हिस्कीवर अवास्तव कर लावतो असे मत व्यक्त केले. ते म्हणाले ‘भारत फार कर आकारणी करतो. आता व्हिस्कीचेच बघा भारत १५० टक्के कर आकारणी करतो. आपल्याला काय मिळते काही नाही.

ट्रम्प हे अमेरिका आणि इतर देशातील कर प्रणाली ही समप्रमाणात असली पाहिजे असे मत वारंवर व्यक्त करत असतात. रेसिप्रोकल ट्रेड ॲक्ट अमेरिकेतील कंपन्यांना आणि कामगारांना इतर देशांबरोबरच्या स्पर्धेत योग्य आणि समान संधी निर्माण करून देईल असे मत ट्रम्प यांनी खासदारांशी बोलताना व्यक्त केले.