गृह मंत्रालयानं जाहीर केली देशातील टॉप-10 पोलीस स्टेशनची यादी, पाहा कोणत्या राज्यांना मिळालं स्थान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील टॉप -10 पोलीस ठाण्यांची यादी जाहीर केली आहे. गृह मंत्रालयाने यंदाही आव्हानात्मक परिस्थितीत सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांसाठी सर्वेक्षण केले. यावेळी कोरोना प्रोटोकॉलचे पालनदेखील एका श्रेणीमध्ये ठेवले गेले आहे. सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हे सर्वेक्षण करण्यात आले.

देशातील पहिल्या दहा पोलीस ठाण्यांच्या यादीमध्ये प्रत्येक पोलीस स्टेशन वेगवेगळ्या राज्यातले आहे. या यादीमध्ये मणिपूरमधील थौबलचे नोंगपोक सेमकई पोलीस स्टेशन पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर तामिळनाडू आणि अरुणाचल प्रदेशच्या पोलीस ठाण्यांनी दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर स्थान मिळवले आहे.

देशातील टॉप-10 पोलीस स्टेशनची यादी :
– नोंगपोक सेमकै (थायल, मणिपूर)

– एडब्ल्यूपीएस सुरमंगलम (सालेम, तामिळनाडू)

– खरसंग (चांगलंग, अरुणाचल प्रदेश)

– झिलमिल (सूरजापूर, छत्तीसगड)

– सांगुएम (दक्षिण गोवा, गोवा)

– कालीघाट (उत्तर व मध्य अंदमान, अंदमान आणि निकोबार बेटे)

– पोकींग (पूर्व जिल्हा, सिक्कीम)

– कंठ (मुरादाबाद, उत्तर प्रदेश)

– खानवेल (दादरा आणि नगर हवेली, दादरा आणि नगर हवेली)

– जम्मिकुंटा टाऊन (करीमनगर, तेलंगणा)

टॉप -10 स्टेशनची निवड कशी सुरू झाली ?
उल्लेखनीय आहे की, 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलीस ठाण्यांची यादी करण्यास सुरुवात केली. पीएम मोदी म्हणाले की, पोलीस ठाण्यांच्या वर्गीकरणासाठी मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी एक मानक निश्चित केले जावे.

कोणत्या आधारावर तयार केली जाते यादी
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृह मंत्रालयाने ही यादी खालील गुन्ह्यांच्या निराकरणाच्या आधारे तयार केली होती :
– मालमत्ता गुन्हे

– महिलांविरोधातील गुन्हे

– दुर्बल घटकांच्या विरोधातील गुन्हे