Government of Telangana | ‘युक्रेनवरून परतलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलणार’; तेलंगणाच्या सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Government of Telangana | रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) या दोन देशांमध्ये झालेल्या युद्धाचे परिणाम सर्वांना भोगावे लागत आहेत. रशियाने केलेल्या आक्रमणामुळे युक्रेनचंं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. युद्धामुळे युक्रेनमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना आपलं शिक्षण अर्धवट सोडून माघारी यावं लागलं. अनेक भारतीय विद्यार्थीही तिथे शिक्षणासाठी गेले होते आता त्यांच्या पुढील भविष्याचं काय असा सवाल उपस्थित झाला आहे. मात्र अशातच युक्रेनमधून माघारी आलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार असल्याचा निर्णय तेलंगणा सरकारने (Government of Telangana) घेतला आहे.

 

युक्रेनमधून माघारी परतलेल्या विद्यार्थांच्या शिक्षणाचा खर्च तेलंगणा सरकार (Government of Telangana) करणार आहे. याबाबत तेलंगणा सरकारमधील मंत्री केटी रामाराव (K. T. Rama Rao) यांनी माहिती दिली. केटीआर हे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (CM K. Chandrashekar Rao) यांचे पुत्र आणि सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीचे (Telangana Rashtra Samithi) कार्यकारी अध्यक्षसुद्धा आहेत.

 

युक्रेनमधून माघारी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने (Central Government) अनेक सवलती दिल्या आहेत. देशातील सर्व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील (Medical College) 50 टक्के जागांवर सरकारी वैद्यकीय शिक्षण संस्थांच्या (Government Medical Education Institute) बरोबरीने फी (Fee) आकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने भारतातील विद्यार्थ्यांना मायदेशी सुरक्षित आणण्यासाठी ‘ऑपरेशन गंगा’ (Operation Ganga) चालवलं होतं. या ऑपरेशनच्या माध्यमातून 18,000 भारतीय विद्यार्थ्यांना माघारी आणण्यात आलं होतं. तेलंगणा सरकारने घेतलेल्या निर्णयाचं देशभरात कौतुक होत आहे.

 

पुणे महापालिका तसेच फक्त आणि फक्त पुण्यातील राजकारणाच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Government of Telangana | telangana governments big decision will bear the cost of education of students returning from ukraine

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा