खुशखबर ! खूप फायद्याची ‘ही’ सरकारी योजना, दरमहा मिळेल 10,000 रुपयांपर्यंत पेन्शन, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – प्रधानमंत्री वय वंदन योजना (PMVVY) मध्ये काही महत्वपूर्ण बदल करत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे, सरकारने या योजनेतील गुंतवणूकीची रक्कम आता दुप्पट केली आहे. एवढेच नव्हे तर या योजनेचा कालावधीही वाढविण्यात आला आहे. याचाच अर्थ प्रत्येक महिन्याला तुम्हाला १० हजारापर्यंत पेन्शल मिळू शकते.
Image result for PMVVY

पाहुयात काय आहे ही योजना
प्रधानमंत्री वय वंदन योजनेंतर्गत नागरिकांना दहा वर्षांपर्यंत आठ टक्के वार्षिक परताव्याच्या हमीसोबत पेंशन दिले जाते. योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर घेता येईल. या योजनेमध्ये साठ वर्षांपेक्षा वरील नागरिक गुंतवणूक करू शकतात.

पेन्शन 10,000 रुपयांपर्यंत असेल
या योजनेत बदल करत गुंतवणुकीचे प्रमाण दुप्पट केल्याने जेष्ठ नागरिकांना मोठा फायदा होईल. सरकारने गुंतवणूकीची मर्यादा आता वाढवून १५ लाख केली आहे. याआधी हि मर्यादा ७.५ लाख होती. ती आता दुप्पट झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दरमहा १० हजार रुपये पेन्शन मिळू शकेल.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक सुरक्षेच्या तरतुदी नक्कीच वाढतील. मार्च २०१८ पर्यंत एकूण २.२३ लाख ज्येष्ठ नागरिक या पेन्शन योजनेचा लाभ घेत आहेत.

तर यापूर्वी वरिष्ठ पेन्शन विमा योजना २०१४ अंतर्गत ३.११ लाख ज्येष्ठ नागरिकांना योजनेचा लाभ मिळाला. यापूर्वी पंतप्रधान वायु वंदन योजना केवळ ४ मे, २०१७ ते ३ मे २०१८ पर्यंत होती. आता झालेल्या बदलानुसार येजनेत गुंतवणूकीचा कालावधी ३१ मार्च २०२० पर्यंत वाढविण्यात आला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –