हे सरकार शिक्षण व्यवस्था नष्ट करणार – नाना पटोले 

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय लोकशाही चा ग्रँथ म्हणजे संविधान आणि शिक्षण हा त्या ग्रंथातील महत्वाचा श्लोक आहे. शिक्षणाने माणूस परिपूर्ण होतो मात्र हे सरकार शिक्षण धार्जिण नाही असं एकंदर दिसत आहे म्हणून केंद्र आणि राज्यातील सत्तेवर असलेलं सरकार अनोखे धोरणं तयार करून सरकारी शाळा बंद पाडण्याचा कट करीत आहे. मुळात शिक्षणाची सुरुवात जिथून होते ती व्यवस्था च सरकारला संपवायची आहे असा आरोप काँग्रेस च्या अखिल भारतीय  किसान संघाचे अध्यक्ष व माजी खासदार नाना पटोले यांनी केला आहे

क‌ाँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारच्या राज्यातील ४५ कॉलेजांना नवीन महाविद्यालयाचे इरादापत्र दिले होते. हे इरादापत्र असलेल्या कॉलेजांची मान्यता युती शासनाने नाकारली, इरादापत्र म्हणजे भविष्यात आम्ही तुम्हाला मान्यता देऊ असे आश्वासन दिले.

शिक्षक भारतीतर्फे आठवे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन येथील धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी (22 डिसेंबर) संमेलनाच्या पहिल्या दिवसाच्या सत्राच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी स्वागताध्यक्ष राजेंद्र झाडे, आ.कपिल पाटील, अशोक बेलसरे, अतुल देशमुख, लोककवी अरुण म्हात्रे, संस्था कार्याध्यक्ष जयवंत पाटील उपस्थित होते. शिक्षक साहित्य संमेलनच्या पहिल्या दिवसाचे उद्घाटन खा. पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. पटोले म्हणाले, सरकारच्या धोरणाचा फटका केवळ  शिक्षकांनाच बसला नसून सामान्य वर्गाला ही यातून मोठा तोटा निर्माण होणार आहे. सावित्रीबाई फुले व जोतिबा फुले यांनी शाळा उघडून शिक्षणाचा पाया बळकट करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याच प्रयत्नांमुळे महिलांनी सर्वच क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. त्यामुळे शिक्षकांनी या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून त्यांच्या विचारांचा सर्वत्र प्रसार करुन जे शिक्षण व्यवस्था संपविण्यास निघाले आहे त्यांनाच संपवून नवीन शैक्षणिक क्रांती निर्माण करू असे ते म्हणाले.

समाजाला सुशिक्षित आणि जागृत करण्याची क्षमता केवळ शिक्षकांमध्ये असल्याचे पटोले यांनी सांगितले. पाटील म्हणाले, सरकारच्या चुकीच्या व जाचक धोरणामुळे जि.प.शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे. सरकारने या शाळेत कमी मुलं आहेत अशी कारणं देत शाळा बंद करुन शिक्षकांची कपात करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे शिक्षण व्यवस्थेवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. शाळा बंद झाल्या तर संस्कारीत पिढी कशी निर्माण होईल त्यामुळे शाळा जीवंत राहू द्या असे मत व्यक्त केले. तर लोककवी अरुण म्हात्रे यांनी शिक्षकांंमधील सृजन आणि साहित्याला वाव मिळावा यासाठीच हे साहित्य संमेलन असल्याचे सांगितले.

तर लोकशाही नष्ट होण्याच्या मार्गावर
लोकांकडील मोबाईल आणि संगणकातील माहितीवर नजर ठेवण्यासाठी केंद्र सरकारने दहा खासगी कंपन्याची नियुक्ती केली आहे. सरकारच्या धोरणामुळे संविधानाचे मुळ असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली असून यामुळे लोकशाही संपुष्टात येणार तर नाही ना अशी शक्यता निर्माण झाली असल्याचे माजी खा. नाना पटोले म्हणाले.

सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सत्कार
शिक्षक भारतीतर्फे संमेलनादरम्यान सेवानिवृत्त मुख्याध्यापक राम अहिवले, पी.एम.बघेले, प्रकाश पंचभाई, कमल बहेकार, के.डी.धनोले, डी.एम.टेंभरे यांचा स्मृती चिन्ह व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. तर उपक्रमशील शाळा म्हणून देवरी शाळेच्या मुख्याध्यापिका रजिया बेग यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us