Governor Bhagat Singh Koshyari | शरद पवारांच्या टीकेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलं उत्तर, म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या (12 mla appointment) मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यावर निशाणा साधला होता. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवार म्हणाले होते, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी 12 आमदारांबाबत अनेकदा पत्र दिलंय. मात्र उतारवयामुळे त्यांना आठवत नसेल असा टोला लगावला होता. त्यानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्रात तिन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार (MVA Government) आल्यापासून राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात कोणत्याना कोणत्या कारणावरुन वाद रंगताना पहायला मिळत आहे. आता शरद पवार यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. शरद पवार यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, शरद पवार देशातील सन्मानीय व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी माझ्यावर टीका केली म्हणून मी करावी असं नाही.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांना राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी गेल्या आठ महिन्यांपासून राज्यपालांकडे प्रलंबित आहे. आता यापुढे 12 आमदारांबाबत आग्रही नाही असं राज्यपाल बोलले होते पण शहाण्यांना शब्दाचा मारा… फक्त शहाण्यांना, यापुढे 12 आमदारांच्या प्रश्नाबाबत शब्द खर्ची घालणार नाही, असे शरद पवार म्हणाले होते.

हे देखील वाचा

Shrimant Kokate | ‘पुणे कोणाच्या बापाचं नाय’ हे मनसेनं लक्षात ठेवावं’

Honey Trap Racket Pune | हनी ट्रॅपद्वारे व्यावसायिकाला लुटणारी टोळी अटकेत, कोंढवा पोलिसांकडून तरूणीसह 6 जणांना अटक

Loan Without Guarantee | खुशखबर ! शेतकरी आता विनागॅरंटी घेऊ शकतात 1.60 लाख रुपयांचे कर्ज, जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Governor Bhagat Singh Koshyari | maharashtra governor bhagat singh koshyari reaction on sharad pawar statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update