Shrimant Kokate | ‘पुणे कोणाच्या बापाचं नाय’ हे मनसेनं लक्षात ठेवावं’

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Shrimant Kokate | देशात लोकशाही आहे. आपल्याकडे अफगाणिस्तान सारखं तालिबानी राज्य आलेले नाही. राज ठाकरेंना दादर मध्ये फिरू देणार नाही हे हास्यास्पद आहे. तसेच प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) यांना पुण्यात फिरून न देणे हेही हास्यास्पदच आहे. गायकवाड हेही पुण्याचेच आहेत ना? त्यामुळे पुणे कोणाच्या बापाचं नाय हे मनसेने लक्षात ठेवावं. असा पलटवार श्रीमंत कोकाटे (Shrimant Kokate) यांनी मनसेचे (MNS) पुणे शहर अध्यक्ष नगरसेवक वसंत मोरेवर (Corporator Vasant More) केला आहे.

श्रीमंत कोकाटे (Shrimant Kokate) हे माध्यमांशी बोलताना वसंत मोरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘मनसेच्या राज ठाकरेंना (Raj Thackeray) वाटत असेल की पुरंदरेना लोटांगण घातले म्हणून आपण खूप मोठे झालो.
तर अशा भ्रमात राहू नका. मी प्रवीण गायकवाड यांच्या भूमिकेचे समर्थन करतो असे देखील ते म्हणाले. ‘बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांच्या शिवचरित्र लेखनावरही श्रीमंत कोकाटे (Shrimant Kokate) यांनी टीका केलीय.
‘आपल्या राज्यात ज्या धार्मिक दंगली झाल्या याला बाबासाहेबांचा शिवचरित्र कारणीभूत आहे. पुरंदरेंनी जिजाऊ आणि शिवरायांची बदनामी करणारी पार्श्वभूमी तयार केली.
हे मनसेला मान्य असेल तर त्यांनी महाराष्ट्र समोर पुढे येऊन ते जाहीर करावं.
बाबासाहेब पुरंदरेंच सातत्याने समर्थन करतात हे महाराष्ट्राला पटत नाही.
लेखनाच समर्थन करणारा व्यक्ती महाराष्ट्राचा शत्रू आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड (Pravin Gaikwad) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर (Raj Thackeray) केलेल्या टीकेनंतर मनसेचे
पुणे शहर अध्यक्ष नगरसेवक वसंत मोरे यांनी म्हटलं होतं की, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातून इच्छुक असणारा तू मी स्वत: गल्लोगल्ली फिरताना तुला पाहिलंय.
मी प्रविण गायकवाड, असं सांगत होतास.
तुला राज ठाकरे काय कळणार? लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू असं ते म्हणाले होते.
यावरून श्रीमंत कोकाटे (Shrimant Kokate) यांनी प्रत्युत्तर दिलंय.

 

काय म्हणाले होते प्रविण गायकवाड?

राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला राज ठाकरे (Raj Thackeray) हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हा सगळा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करत दिसत आहे.
त्यांना जसे पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, तसेच त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नाही.
अशी टीका प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) यांनी केलीय.

परंतु हा संघर्ष उभा करत असताना त्यांना 1899 ते 1999 या 100 वर्षाच्या काळात महाराष्ट्रात झालेल्या सांस्कृतिक संघर्षाचा आणि आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या वारशाचा विसर पडला आहे हे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
त्यांची सध्याची जी काही मांडणी आहे, ती प्रबोधनकार ठाकरेंच्या ब्राह्मणेतर विचारांपासुन फारकत घेणारी आणि परुंदरेंच्या ब्राह्मणी वर्चस्वाच्या विचारणसरणीला जवळ करणारी आहे हे मात्र नक्की असेही ते म्हणाले आहेत.

 

Web Title : Shrimant Kokate | mns should remember whose fathers hero pune rich cockatoos reply vasant more

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Loan Without Guarantee | खुशखबर ! शेतकरी आता विनागॅरंटी घेऊ शकतात 1.60 लाख रुपयांचे कर्ज, जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ

Pune Crime | खरेदीसाठी आलेल्या महिलांनी हात चालाकीने पळवले सोन्याचे ब्रेसलेट (व्हिडीओ)

Mumbai Crime | ‘या’ अभिनेत्रीचा इंटेरिअर डिझायनरवर छेडछाडीचा गंभीर आरोप; मुंबईत FIR दाखल