Governor Bhagat Singh Koshyari | ‘दुनिया में सबसे जादा ‘मीडिया’ से डर लगता है’

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – कालपासून राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांचा मराठवाडा (Marathwada) दौरा आहे. राज्यपाल हे नांदेड-परभणी- हिंगोली या जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांचा मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांच्या 3 दिवसीय दाैऱ्याला गुरुवारपासून नांदेडमधून (Nanded) प्रारंभ झाला. नांदेड जिल्ह्यात असताना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी एक भाष्य केलं आहे. ‘मुझे दुनिया में सबसे जादा डर लगता है, ताे वाे मीडियासे’ असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे दिवसभर अनेक कार्यक्रम पार पाडले. राज्यपाल यांनी विद्यापीठात श्री गुरुगोविंदसिंघ अध्यासन केंद्र इमारतीच्या बांधकामाचा आढावा घेतला. विद्यापीठ येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल म्हणाले की, ‘मला लोकांमध्ये मिसळून राहायला आवडते. लोकांमध्ये गेलो तर अनेक गोष्टी शिकायला मिळतात. असं त्यांनी म्हटलं आहे. विद्यापीठातील कार्यक्रम पार पडल्यानंतर राज्यपाल सचखंड गुरुद्वारा येथे पोहोचले. मात्र, धार्मिकस्थळ बंद असल्यामुळे गुरुद्वाराच्या पायऱ्यांवरूनच त्यांनी दर्शन घेतले. तिथे त्यांनी गुरुद्वारा बोर्डाचे 2 सदस्य आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

‘मी कुठलीही आढावा बैठक घेतली नाही, जनतेच्या विकासाचे जे 3 डेव्हलपमेंट बोर्ड आहेत त्याचे अधिकार मला संविधानाने दिले आहेत, मी जिथे जातो तिथे 2-3 अधिकाऱ्यांना बोलावून त्याबाबत चर्चा करतो, तशीच चर्चा आज केली असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यावेळी म्हटलं आहे.

हे देखील वाचा

Pune Corporation | पुणे महापालिकेत समाविष्ट केलेल्या 23 गावांसह हद्दीत टेकड्यांच्या पायथ्यालगत 1 मजल्यास परवानगी

Pune lockdown | पुण्यात निर्बंध जोमात अन् व्यावसायिक कोमात

Modi Government | PM मोदींचा मोठा निर्णय ! ’राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराचे नाव बदलले; जाणून घ्या नवीन नाव

Thackeray Government | ठाकरे सरकार लोक कलावंतांना 5 हजराची मदत करणार, किमान 56 कलाकारांना आर्थिक मदत मिळणार

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Governor Bhagat Singh Koshyari | most feared media world governor bhagat singh koshyari

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update