
Governor Bhagat Singh Koshyari | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर नवी जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता
पंतप्रधानांचे राष्ट्रीय सल्लागार कोचीहून थेट मुंबईत
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Governor Bhagat Singh Koshyari | आयएनएस विक्रांत (INS Vikrant) या विमानवाहू युद्धनौका नौदलामध्ये सहभागी होण्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले पंतप्रधानांचे राष्ट्रीय सल्लागार National Security Advisor (India) अजित कुमार डोवल (Ajit Doval) हे कोचीहून (Kochi) थेट मुंबईला (Mumbai) येत आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनात (Raj Bhavan) भेट घेतली. त्यामुळे नव्या समीकरणाची चर्चा सुरु झाली आहे. (Governor Bhagat Singh Koshyari)
राष्ट्रीय सुरक्षेबाबत पंतप्रधानांचे राष्ट्रीय सल्लागार असलेले अजित डोवल हे अनेक महत्वाच्या आघाडीवर कार्यरत असतात. त्यामुळे त्यांनी राज्यपाल यांची सदिच्छा भेट घेतली असल्याचे सांगण्यात आले असले तरी त्यामागचे कारण वेगळेच असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Governor Bhagat Singh Koshyari)
The National Security Advisor to the Prime Minister of India Ajit Kumar Doval met Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai. This was a courtesy call. pic.twitter.com/N9WkqP6V1a
— Governor of Maharashtra (@maha_governor) September 3, 2022
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक असणारे भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून ५ सप्टेबर २०१९ रोजी नियुक्ती करण्यात आली होती.
त्याला आता तीन वर्षे पूर्ण होत आहे.
कोश्यारी यांच्या नियुक्तीनंतर काही महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) शिवसेनेने भाजपशी युती (Shiv Sena BJP alliance) तोडून काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसशी (Congress – NCP) आघाडी करीत महाविकास आघाडी स्थापन केली होती.
या आघाडीला वेळोवेळी विरोध करुन अडचणीत आणण्याचा आटोकाट प्रयत्न राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला होता.
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीला त्यांनी गेल्या दोन वर्षात मंजुरी दिली नाही.
आता महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) कोसळून नवीन भाजप – शिंदे गटाचे (BJP – Shinde group) सरकार महाराष्ट्रात आले आहे.
त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे राज्यातील काम पूर्ण झाले असल्याची चर्चा आहे.
त्याचवेळी अजित डोवल यांनी त्यांची आज भेट घेतल्याने कोश्यारी यांच्यावर वेगळी जबाबदारी सोपविणार का यावर चर्चा सुरु झाली आहे.
Web Title : – Governor Bhagat Singh Koshyari | National Security Advisor (NSA) to the Prime Minister of India Ajit Kumar Doval met Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update