ACB Trap on PSI Dilip Sapate | 45 हजाराची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक दिलीप सपाटे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap on PSI Dilip Sapate | पोलीस ठाण्याच्या हद्दीतून रेतीची वाहतूक (Sand Transport) करण्यासाठी प्रति ट्रक 15 हजारप्रमाणे 5 ट्रकसाठी 75 हजार रुपये लाच मागून (Demanding Bribe) तडजोडी अंती 45 हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) उमरेड तालुक्यातील बेला पोलीस ठाण्यातील (Bella Police Station) पोलीस उपनिरीक्षकला (Police Sub-Inspector) नागपूर एसीबीच्या पथकाने रंगेहात (Nagpur ACB Trap on PSI) पकडले. नागपूर एसीबीच्या पथकाने ही कारवाई गुरुवारी (दि.1) रात्री उशीरा बेला परिसरात केली. (ACB Trap on PSI Dilip Sapate)

 

दिलीप पुंडलिक सपाटे PSI Dilip Pundalik Sapate (वय – 57 रा. फ्रेंड्स कॉलनी, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याबाबत मंगरूळपीर तालुक्यातील तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau (ACB) Nashik) लेखी तक्रार केली. तक्रारदार यांचे पाच ट्रक बेला परिसरातून रेतीची वाहतूक करतात. ही वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सपाटे याने तक्रारदार यांना प्रति ट्रक 15 हजार रुपयेप्रमाणे 75 हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी नागपूर एसीबीकडे तक्रार केली. (ACB Trap on PSI Dilip Sapate)

नागपूर एसीबीच्या युनिटने पडताळणी केली असता पोलीस उपनिरीक्षक दिलीप सपाटे याने 75 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 45 हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गुरुवारी रात्री बेला परिसरात सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून 45 हजार रुपये लाच घेताना सपाटे याला रंगेहात पकडण्यात आले. सपाटे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) बेला पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला (Nagpur ACB SP Rakesh Ola),
अपर पोलीस अधीक्षक मधुकर गीते (Addl SP Madhukar Geete)
यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक योगिता चाफले (Deputy Superintendent Yogita Chafle),
पोलीस निरीक्षक आशिष चौधरी (Police Inspector Ashish Chaudhary)
पोलीस अंमलदार वर्षा मते, सुरेंद्र शिरसाट, अनिल बहिरे, अस्मिता मल्लेलवार, अमोल मेंघरे, हर्षलता भरडकर यांच्या पथकाने केली.

 

Advt.

Web Title : –  ACB Trap on PSI Dilip Sapte | police sub inspector psi dilip pundalik sapate arrested for taking bribe from sand transporter nagpur crime news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा