Gram Panchayat Election Result 2022 | निवडणूक निकालानंतर झालेल्या दगडफेकीत भाजप कार्यकर्त्याचा मृत्यु; जळगाव येथील घटना…

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन | राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल (Gram Panchayat Election Result 2022) लागत आहेत. स्थानिक पातळीवर पक्षबांधणीसाठी ग्रामपंचायतीत सगळेच राजकीय पक्ष आपली सत्ता येण्यासाठी प्रयत्न करत असतात. गावगाड्याच्या राजकारणात ग्रामपंचायत निवडणूक (Gram Panchayat Election Result 2022) ही अतिशय प्रतिष्ठेची मानली जाते. त्यात विविध गटांमध्ये वाद झालेले देखील पहायला मिळतात. तसाच काहीसा प्रकार जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात घडला आहे. निवडणूक निकालानंतर झालेल्या दगडफेकीत एका भाजप कार्यकर्त्याने आपला जीव गमावला आहे.

जळगाव येथील जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द या गावात विजयी मिरवणूक सुरू असताना झालेल्या वादातून एका कार्यकर्त्याचा मृत्यु झाला. धनराज माळी असे या कार्यकर्त्याचे नाव असून तो भाजपचा कार्यकर्ता होता. राज्यात सुरू असलेल्या ग्रामपंचायत निकालात बहुतांश ठिकाणी भाजपने बाजी मारल्याचे दिसत आहे. जामनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये देखील भाजपचेच वर्चस्व पहायला मिळत आहे.

यादरम्यान जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द या ग्रामपंचायतीची देखील निवडणूक होती. या निवडणूकीत दोन्हीकडून भाजपचेच कार्यकर्ते एकमेकांविरोधात उभे होते. यात परिवर्तन पॅनलचा विजय झाला. त्यानंतर या पॅनलच्या पदाधिकाऱ्यांसोबत कार्यकर्त्यांची मिरवणूक सुरू असताना अचानक एका ठिकाणी दगडफेक झाली. या घटनेत धनराज माळी हा गंभीर जखमी झाला. जखमी धनराजला जामनेर येथील रूग्णालयात हलवले असता वाटेतच त्याचा मृत्यु झाला.

या घटनेनंतर टाकळी खुर्द येथे तणावपूर्ण वातावरण झालेले पहायला मिळाले.
तसेच गावकऱ्यांनी या घटनेनंतर प्रचंड आक्रोश केला.
त्यानंतर सबंध जामनेरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून सर्वत्र खळबळ उडाली आहे.
या घटनेतील २०-२५ संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तसेच तणावाच्या पार्श्वभूमीवर टाकळी खुर्द या गावात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

Web Title :- Gram Panchayat Election Result 2022 | gram panchayat election stone pelting by defeated group in jalgaon death of bjp worker

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Winter Session 2022 | महाविकास आघाडीच्या कामांना स्थगिती देण्याचे कारण काय? म्हणत विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल…

Thane ACB Trap | 3 हजाराची लाच घेताना पोलीस अ‍ॅन्टी कप्शनच्या जाळ्यात, पोलीस ठाण्यातच स्विकारली लाच

Winter Foods | हिवाळ्यात शरीर आतून ठेवायचे असेल गरम? रोज खा हे 3 फूड्स, थंडीपासून होईल रक्षण