Winter Session 2022 | महाविकास आघाडीच्या कामांना स्थगिती देण्याचे कारण काय? म्हणत विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन | सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन (Winter Session 2022) नागपूर येथे सुरू असून विविध मुद्यांवर विरोधक सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला घेरताना दिसत आहेत. सोमवारी विरोधकांनी कर्नाटक सीमाप्रश्नी विद्यमान सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. पण फडणवीसांच्या कर्नाटक सीमाप्रश्नीच्या उत्तरावर विरोधक थोडेसे बॅकफूटवर गेल्याचे पहायला मिळाले. आज मंगळवार हा हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session 2022) दुसरा दिवस असून सकाळपासूनच विरोधक चांगलेच आक्रमक पहायला मिळाले.

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन करण्यात आले. त्यादरम्यान विरोधकांनी हातात फलके तसेच घोषणाबाजी देखील केली. विरोधकांनी सरकारला महाविकास आघाडीच्या काळात मंजुरी देण्यात आलेल्या विकासकामांना स्थगिती देण्याचे कारण काय? असा सवाल विचारला. आणि या मुद्यावर विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करण्यात आली. तसेच आमच्या कार्यकाळात मंजुरी देण्यात आलेल्या कामाला स्थगिती दिल्यामुळे हे सरकार विकास विरोधी असून, फक्त मलिदा खाण्यात हे सरकार पुढे आहे. तसेच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या, भूखंडाचा श्रीखंड खाणारे मुख्यमंत्री, बिल्डर धार्जिन्या सरकारचा निषेध असो. अशी घोषणाबाजी करत विरोधकांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला.

त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मुद्यावर विरोधकांची समजूत काढताना दिसले.
फडणवीस म्हणाले, स्थगिती दिलेली ७० टक्के कामे परत सुरू करण्यात आली असून उर्वरित कामांच्या
बाबतीत देखील विचार करून निर्णय घेऊ अशी ग्वाही गोंधळ घालणाऱ्या विरोधक आमदारांना उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

आज महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक संपल्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी
काँग्रेस कार्यालय ते विधानभवन हा मोर्चा काढला.
त्यावेळी बेळगाव, निपाणी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा स्वरूपाचा मजकूर लिहिलेल्या गांधी
टोप्या नेत्यांनी घातल्या होत्या. तानाशाही नही चलेगी, फडणवीस सरकारचा धिक्कार असो,
पन्नास खोके एकदम ओके, या सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय…. अशा स्वरूपाच्या घोषणा
यावेळी देण्यात आल्या.

Web Title :- Winter Session 2022 | maharashtra assembly winter session 2022 mahavikas aaghadi mlas chaos vidhansabha over suspension of development works

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Thane ACB Trap | 3 हजाराची लाच घेताना पोलीस अ‍ॅन्टी कप्शनच्या जाळ्यात, पोलीस ठाण्यातच स्विकारली लाच

Winter Foods | हिवाळ्यात शरीर आतून ठेवायचे असेल गरम? रोज खा हे 3 फूड्स, थंडीपासून होईल रक्षण

Gram Panchayat Election Result-2022 | विरोधीपक्षनेते अंबादास दानवेंचा पालकमंत्री भुमरेंना दणका, बिडकीन, आडुळमध्ये ठाकरे गटाचे सरपंच