Gram Panchayat Election | ग्रामपंचायत निवडणुकीत दीपक केसरकरांना ठाकरे गटाचा दणका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात ग्रामपंचायतीच्या (Gram Panchayat Election) मतांची मोजणी सुरू आहे. रविवारी राज्यातील विविध अशा 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यांचा आज (दि. 20) निकाल लागणार आहे. सकाळपासून पहिल्या टप्प्यातील मतमोजणी पूर्ण झाली आहे. त्याच्या निकालात भोमवाडी ग्रामपंचायतीमध्ये ठाकरे गटाने खाते उघडले आहे. सरपंचपदी अनुराधा वराडकर यांची नियुक्ती झाली आहे. तर जिल्ह्यात प्रतिष्ठेची मानली गेलेली निवडणूक म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील केसरी ग्रामपंचायत. याठिकाणी भाजपने आपला झेंडा लावला आहे. या ग्रामपंचायतीत (Gram Panchayat Election) अनेक वर्षे शिवसेनेचे वर्चस्व होते.

सावंतवाडीच्या केसरी गावात शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. सावंतवाडी तालुक्यात पहिल्या टप्प्यात दहा ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले.
यात भाजपने वर्चस्व राखले आहे. तर ठाकरे गटाने देखील खाते उघडण्यास सुरुवात केली आहे.
शिवसेनेने भोमवाडी आणि सातार्डा ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे. त्यामुळे हा दीपक केसरकारंना धक्का मानला जातो.

राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आहे.
यामुळे सर्वच पक्षांचे आणि जनतेचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.
महाविकास आघाडी आणि भाजप, शिंदे गटाने या निवडणुकांसाठी मोठी मोर्चेबांधणी केली होती.
सर्वांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. सर्वांना ही निवडणूक जिंकायची आहे.
त्यामुळे दिवसभरात कोण कोणाला धक्के देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Web Title :- Gram Panchayat Election | shinde group spokesperson and minister deepak kesarkar lost and thackeray group wins two gram panchayat

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut | देवेंद्र फडणवीस यांच्या ‘त्या’ दाव्यावर संजय राऊतांचा खोचक टोला, म्हणाले-‘नैरोबी-केनियाला देखील… ‘

Devendra Fadnavis | ‘चिंता करू नका, भाजप ग्रामपंचायतींच्या निकालात बाजी मारेल’ – देवेंद्र फडणवीस

Poonam Pandey | ‘बेशरम रंग’ गाण्यावर थिरकली पूनम पांडे; कातील अदांनी चाहते घायाळ…